Mortgage Loan: ‘या’ टिप्स वापरा आणि तारण कर्जाची परतफेड पटापट करा व ताबडतोब कर्जमुक्त व्हा! वाचा माहिती

होमलोन घेताना आपण आपली मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेत असतो. त्यामुळे अशा कर्जामध्ये आपली तारण ठेवलेली प्रॉपर्टी लवकरात लवकर बँकेच्या ताब्यातून मोकळी करण्याकरिता व तुम्ही स्वतः देखील कर्जमुक्त होण्यासाठी तारण कर्ज लवकर फेडणे खूप फायद्याचे ठरते.

Ajay Patil
Published:

Mortgage Loan:- आपण आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या गुंतवणुकीसाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी कर्ज घेतो. कर्ज घेत असताना ते आपल्याला दोन प्रकारे मिळते व कर्जाचे हे जे दोन प्रकार बघितले तर यामध्ये एक असते ती सुरक्षित कर्ज व दुसऱ्या असते ते असुरक्षित कर्ज. यामध्ये सुरक्षित कर्ज म्हणजे आपण कर्ज घेताना बँकेला किंवा वित्तीय संस्थांना काही मालमत्ता तारण देतो व त्यात दिलेल्या मालमत्तेवर आपल्याला कर्ज मिळत असते व याला सुरक्षित कर्ज म्हटले जाते.

दुसरा प्रकार हा असुरक्षित कर्जाचा असतो व यामध्ये तुम्हाला कुठल्याही मालमत्तेचे तारण न देता कर्ज मिळते व याचे उत्तम उदाहरण पर्सनल लोन हे सांगता येईल. जेव्हा आपण तारण कर्ज घेतो तेव्हा आपल्याला एखादी वस्तू गहाण म्हणजेच तारण ठेवून त्याबद्दल कर्ज दिले जात असते. तारण कर्जाचे उत्तम उदाहरण जर घेतले तर होमलोन हे घेता येईल.

होमलोन घेताना आपण आपली मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेत असतो. त्यामुळे अशा कर्जामध्ये आपली तारण ठेवलेली प्रॉपर्टी लवकरात लवकर बँकेच्या ताब्यातून मोकळी करण्याकरिता व तुम्ही स्वतः देखील कर्जमुक्त होण्यासाठी तारण कर्ज लवकर फेडणे खूप फायद्याचे ठरते.

त्यामुळे आपण या लेखात काही छोट्या टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमची तारण ठेवलेली प्रॉपर्टी देखील बँकेच्या ताब्यातून लवकर मोकळी करू शकतात व स्वतःवरील कर्जाचा बोजा देखील कमी करू शकतात.

 कर्जाचा बोजा लवकरात लवकर कमी करण्यासाठी फायद्याच्या टिप्स

1- कर्जाचा कालावधी कमी करणे आता जर आपण होमलोन घेतले तर आपल्याला माहित आहे की त्याचा कमीत कमी कालावधी हा 20 ते 30 वर्षांचा असतो. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी जर तुम्हाला कर्जाचा हप्ता भरायचा असेल तर तो साहजिकच कमी स्वरूपामध्ये तुम्हाला भरावा लागतो. परंतु तुम्ही घेतलेल्या कर्जाचा कालावधी जर कमी केला तर तुमचा महिन्याचा ईएमआय मात्र वाढतो.

परंतु तुम्ही जर कालावधी कमी केला व ईएमआय वाढला तर तुम्ही तुमचे कर्ज कमी कालावधीत फेडू शकतात. याचा फायदा असा होतो की तुमचे व्याजाच्या रूपाने जे जाणारे जास्त पैसे असतात ते वाचतात व लवकरात लवकर कर्ज फेडायला मदत होते.

2- प्रत्येक वर्षाला एक्स्ट्रा ईएमआय भरणे कर्जाच्या जोखडा तून तुम्हाला पटकन मोकळे व्हायचे असेल तर तुम्ही बँकेच्या नियमाप्रमाणे कर्जाचे हप्ते भरणे गरजेचे असते व त्या पद्धतीने जर तुम्ही हप्ते भरत असाल तर नक्कीच तुम्हाला 20 ते 30 वर्षे लागतात व यामुळे तुम्ही कर्जाच्या रकमेच्या दुप्पट पैसे बँकेला व्याज म्हणून भरत असतात.

हे आर्थिक नुकसान जर तुम्हाला टाळायचे असेल तर तुम्ही प्रत्येक वर्षी एक जास्तीचा ईएमआय भरणे गरजेचे आहे. अशा प्रकारे एक जास्तीचा ईएमआय भरल्यामुळे तुमच्या कर्जातील मुद्दल रक्कम कमी होते व कर्जाचा कालावधी व व्याज देखील कमी होण्यास मदत होते.

3- कर्ज ट्रान्सफर करणे तुम्ही ज्या बँकेकडून ज्या व्याजदराने कर्ज घेतलं आहे त्याच व्याजदरात बँकेकडून जर वाढ केली जात असेल आणि त्यामुळे जर तुमच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर विपरीत परिणाम होत असेल तर मात्र तुम्ही तुमचे कर्ज ट्रान्सफर करणे खूप गरजेचे आहे.

या पर्यायांमध्ये तुम्हाला जी बँक सध्याच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजाने कर्ज देत असेल तर अशा बँकेमध्ये तुम्ही तुमचे लोन ट्रान्सफर करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची कर्जाची रक्कम कमी व्हायला मदत होतेच आणि त्यामुळे कर्ज सुद्धा लवकर फेडता येते.

4- कर्जाची मुद्दल कमी करणे समजा तुम्ही कर्ज घेतले आहेत व त्याची परतफेड देखील सुरू आहे. परंतु काही मार्गाने जर तुमच्याकडे मध्यंतरी एखादी मोठी रक्कम आली तर ती रक्कम कर्जाची मुद्दल रक्कम परतफेड करण्यासाठी वापरणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक दोन महिन्यांनी एक ठराविक रक्कम मुद्दल कमी करण्यासाठी वापरत गेला तर तुमची कर्जाची रक्कम आपोआप कमी होते व त्यावरील कर्जाचा कालावधी आणि व्याज असे दोन्ही कमी होऊन मोठ्या प्रमाणावर पैसे वाचतात व तुम्ही कर्जाच्या विळख्यातून  लवकर बाहेर येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe