Mosquito Relief Tips:- डास ही एक खूप मोठी समस्या असून अडगळीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी अस्वच्छता असते अशाच ठिकाणी डास असतात असे नाही. बरेचदा आपण पाहतो की घरामध्ये आणि परिसरात कितीही स्वच्छता राहिली तरी देखील डास असण्याचे प्रमाण दिसून येते. ग्रामीण भाग असो की शहरी भाग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डासांचा प्रादुर्भाव हा दिसून येतो.
साधारणपणे संध्याकाळी पासून ते रात्रीपर्यंत डास मोठ्या प्रमाणावर चावतात. त्यामुळे घरात डास येऊ नये याकरिता प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात. यामध्ये मॉस्किटो कॉइल्स, मॉस्किटो मारण्यासाठी चे रॅकेट मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तसेच फास्ट कार्डचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
परंतु तरीदेखील डासांचे नियंत्रण होईल असे नाही. डास चावल्यामुळे अंगाला खाज तर येतेच परंतु काही आजार होण्याची देखील शक्यता बळावते. तसेच कॉइल वगैरे लावल्यामुळे त्यातील रासायनिक घटकांनी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
सगळ्या परिस्थितीत जर नैसर्गिक पद्धतीने डासाचे निर्मूलन करता आले तर नक्कीच आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते फायद्याचे ठरते व डांस देखील पळून लावण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण अशा काही रोपांची माहिती घेणार आहोत की ते डास पळवून लावण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.
घरात किंवा घराच्या बागेत लावा ही रोपे आणि पळवा डास
1- रोजमेरी– डास नियंत्रणात आणण्याकरिता किंवा डासांना घरातून पळून लावण्यासाठी रोजमेरीचे रोप अतिशय फायद्याचे ठरते. या रोपाच्या वासाने डास नाहीतर माशा आणि इतर कीटक देखील घरापासून दूर जाण्यास मदत होते. विशेष म्हणजे रोज मेरीच्या वासाचे ऑल आउट किंवा उदबत्ती देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मिळते. घराच्या बगीच्या मध्ये देखील हे रोपटे लावले तरी खूप फायदा होतो. तसेच कुंडीत लावून तुम्ही घरात देखील हे रोप उत्तम पद्धतीने वाढवू शकतात.
2- पुदिना– पुदिना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही एक औषधी वनस्पती असून अनेक औषधांमध्ये आणि स्वयंपाकातील पदार्थांमध्ये देखील पुदिन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पुदिन्याचा जो काही उग्र वास असतो त्यामुळे डास घरापासून लांब राहण्यास मदत होते. तुम्ही घरातील कुंडीत देखील पुदिन्याचे रोपटे लावू शकतात व त्याची वाढ करू शकतात. डासांना पळवण्यासाठी खूप फायदेशीर असल्यामुळे पुदिन्याचे रोपटे घरात लावणे खूप गरजेचे आहे.
3- लव्हेंडर– लव्हेंडरचे रोपटे तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या आत देखील कुंडीत लावू शकतात. या झाडामुळे देखील घरात डास अजिबात येत नाहीत. तुम्ही झोपत असलेल्या बेडरूममध्ये जर कुंडीत हे झाड लावले तर रात्रीच्या वेळी डासांपासून तुम्हाला कायमची मुक्तता मिळू शकते. विशेष म्हणजे कोणत्याही ऋतूत याचे रोप सहज मिळते आणि वाढ देखील चांगली होते.त्यामुळे तुम्ही केव्हाही याची लागवड करू शकतात. लव्हेंडर च्या फुलांचा वास डासांना घरात येण्यापासून दूर ठेवते.
अशा पद्धतीने तुम्ही या तीनही रोपांची लागवड जर घराच्या बाल्कनीत किंवा घरामध्ये केली तर तुम्ही डासांपासून कायमची मुक्तता मिळवू शकतात.