MPSC Exam:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत विविध प्रशासकीय पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी रात्रंदिवस प्रचंड प्रमाणात अभ्यास करून यशस्वी होण्यासाठी धडपड करत असतात.
या परीक्षांचा एक नेमका असा अभ्यासाचा पॅटर्न असून त्यानुसारच अभ्यास करण्यावर विद्यार्थ्यांचा भर असतो. परंतु जून 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या पद्धतीत व अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
व या बदलाची अंमलबजावणी ही 2023 पासूनच होणार होती. परंतु अचानकपणे करण्यात आलेल्या या बदलाला विद्यार्थ्यांनी विरोध केला होता व त्यामुळे हा बदल 2025 पासून लागू होईल असा निर्णय घेण्यात आला होता.
एमपीएससी परीक्षांमध्ये करण्यात आलेला बदल 2025 पासूनच होईल लागू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जून 2022 मध्ये परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बदलानुसार वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका तसेच मुलाखत आणि लेखी परीक्षा असे मिळून 2 हजार 25 गुण या प्रकारचे सुधारित स्वरूप ठरवण्यात आलेले होते व या सुधारित बदलाची अंमलबजावणी 2023 पासून होणार होती.
परंतु एकाच वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या बदलला विद्यार्थी कसे सामोरे जाणार? हा विद्यार्थ्यां समोरील प्रश्न होता व त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदलाला विरोध केला होता. आपल्याला माहिती आहे की पुणे सह इतर ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या हत्यार उपसले होते.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनाची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली होती व परीक्षेचे जे काही वर्णनात्मक स्वरूप आहे ते 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहिती अधिकाराचा वापर केला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबत नेमका काय निर्णय आहे? यासंबंधीचे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार आयोगाकडून सांगण्यात आले आहे की जे काही वर्णनात्मक पद्धत लागू केली जाणार आहे ती 2025 पासूनच लागू होईल.
त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांमध्ये जी kahi संभ्रमाची अवस्था होती ती आता दूर झाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 2025 पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे.