Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर स्टॉक, एक लाखाचे बनलेत 12 कोटी; कोणता आहे तो स्टॉक, पहा….

Multibagger Stock Information : असं म्हणतात की सब्र का फल बहुत मीठा होता है! निश्चितच हे खरं आहे. शेअर मार्केटमध्ये देखील हा नियम लागू होतो. जे गुंतवणूकदार लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करतात त्यांना नेहमीच चांगला परतावा मिळत असतो. काही मल्टिबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा देतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निश्चितच सर्वच शेअर्स लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा देतातच असे नाही. पण बहुधा अनेक स्टॉक गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देण्याची किमया साधतात. अशाच एका स्टॉक ची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

आज आपण अशा स्टॉक विषयी जाणून घेणार आहोत ज्या स्टॉकने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना लखपतीचे कोट्याधीश बनवले आहे. हो, या स्टॉकने गुंतवणूकदाराच्या एका लाखाचे चक्क बारा कोटी बनवले आहेत. आता तुम्हाला देखील या स्टॉक बाबत जाणून घ्यायचं असेल नाही का? चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

हे पण वाचा :- नाशिक निओ मेट्रो प्रकल्पाबाबत मोठ अपडेट; आता नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे रवाना, 1100 कोटी रुपयांचा होणार खर्च, पहा संपूर्ण रूट

कोणता आहे तो ‘कुबेर का खजाना’वाला स्टॉक

दीपक नायट्रेट चा हा स्टॉक आहे. या कंपनीचे शेअर 2003 मध्ये दोन रुपये आणि 85 पैशावर ट्रेड करत होते. मात्र आजच्या घडीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर हा शेअर 1862 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने 2003 मध्ये या स्टॉक मध्ये एक लाख रुपये गुंतवणूक करून ते होल्ड केले असतील तर त्या व्यक्तीला चांगला परतावा मिळाला असेल. मध्यंतरी या स्टॉकने काही बोनस शेअर देखील आपल्या गुंतवणूकदारांना दिले आहेत.

1:1 या प्रमाणात या कंपनीने बोनस शेअर्स गुंतवणूकदारांना दिले आहेत. म्हणजेच 2003 मध्ये एखाद्या व्यक्तीने जर एक लाख रुपये गुंतवणूक केले असतील तर त्याला या कंपनीचे 35 हजार 87 शेअर्स मिळाले असतील. शिवाय कंपनीने बोनस शेअर्स दिले असल्याने शेअर्सची संख्या 70,175 झाली असेल. अशा पद्धतीने या स्टॉकच्या 70,175 शेअरची सध्याची किंमत बारा कोटी 90 लाख रुपये बनते.

हे पण वाचा :- सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

म्हणजेच जर गुंतवणूकदारांनी 2003 मध्ये या स्टॉक मध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केली असेल आणि ही गुंतवणूक आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदाराला 12 कोटी 90 लाख रुपये मिळणार आहेत. दीपक नायट्रेट ही केमिकल सेक्टर मधील कंपनी असून या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास दहा वर्षांच्या काळात चांगला परतावा देण्याचे काम केले आहे.

मित्रांनो, शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते. यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे. येथे दिलेली माहिती ही वित्तीय सल्ला नसून एक सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीच्या आधारे गुंतवणूकदारांना कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ बहुचर्चित उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला, आता ‘या’ महिन्यानंतर सुरु होणार, पहा….