Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

खरं काय ! ‘हा’ 2 रुपयाचा स्टॉक 3 वर्षातच बनला 714 रुपयाचा, गुंतवणूकदारांना तीन वर्षातच मिळाला 25,407% परतावा, वाचा….

या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वर्षांच्या काळामध्ये 25,407% परतावा देण्याची अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे.

Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही अविश्वसनीय घटना घडतात ज्यावर डोळ्यांनी विश्वास ठेवणे देखील मुश्किल बनते. एका रात्रीतच काही स्टॉक गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा परतावा देतात तर काही स्टॉक रात्रीतच गुंतवणूकदारांचे करोडो रुपये लॉस करतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एकंदरीत शेअर मार्केट हे संपूर्णपणे जोखीम पूर्ण क्षेत्र आहे. मात्र या जोखीमेच्या क्षेत्रात असे अनेक स्टॉक आहेत त्यांनी गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा परतावा अवघ्या काही महिन्यांच्या आणि वर्षांच्या काळातच मिळवून देण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….

दरम्यान आज आपण अशा एका स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत जो तीन वर्षांपूर्वी मात्र दोन रुपयांवर ट्रेड करत होता मात्र आज 2023 मध्ये हा स्टॉक ७१४ रुपयांवर ट्रेड करत आहे. अर्थातच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वर्षांच्या काळामध्ये 25,407% परतावा देण्याची अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे.

निश्चितच आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात सर्व माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या स्टॉक संदर्भात सर्व माहिती अगदी थोडक्यात.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…

कोणता आहे तो मल्टिबॅगर स्टॉक

एसजी फिनसर्व असं या स्टॉकच नाव आहे. ही कंपनी बँकिंग गुंतवणूक आणि निधी व्यवस्थापनाशी संबंधित आहे. या कंपनीच्या स्टॉकने गेल्या तीन वर्षात 25 हजार 407% रिटर्न्स आपल्या गुंतवणूकदारांना दिले आहेत. गेल्या दोन वर्षाच्या काळात या शेअरने 28 हजार 130% परतावा दिला आहे.

2020 मध्ये या कंपनीचा स्टॉक दोन रुपयाच्या आसपास बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ट्रेड करत होता. आता 2023 मध्ये हा टॉक 714 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉक मध्ये खरी वाढ होण्यास सुरुवात झाली ती 2021 पासून. 2021 पासून या स्टॉक मध्ये वाढ होत असून तीन वर्षांत या शेअरने 25407 टक्क्यांचा परतावा देण्याची किमया साधली आहे.

हे पण वाचा :- राम भक्तांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला खुले होणार अयोध्येतील भव्य राम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी माहिती

तर दोन वर्षांत या शेअरने 28130 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एवढेच नाही तर गेल्या एका वर्षांत या शेअरने जवळपास 900 टक्क्यांचा रिटर्न दिला. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 255 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला आहे. अर्थातच गेल्या तीन वर्षांपासून हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे.

मित्रांनो येथे दिलेली माहिती ही स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात आहे. ही माहिती कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला नाही याची नोंद घेणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांची झाली चांदी ! ‘या’ राज्य शासनाने चक्क 8% महागाई भत्ता वाढवला, शासन निर्णयही निघाला, वाचा सविस्तर