काय सांगता ! ‘हा’ स्टॉक एका वर्षात 31 हजार 355 रुपयांनी वाढला, गुंतवणूकदार बनलेत मालामाल; पहा या मल्टीबॅगर स्टॉकची कुंडली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही मोठी कामाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. वास्तविक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नेहमीच लॉंग टर्म मध्ये इन्वेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

लॉंगटर्ममध्ये अर्थातच दीर्घकालीन गुंतवणूक केली तर निश्चितच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. यासाठी मात्र गुंतवणूकदारांनी चांगला अभ्यास करणे जरुरीचे आहे आणि आपल्या वित्तीय सल्लागाराशीं कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील याबाबत चर्चा करणे, त्यांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे.

जर गुंतवणूकदारांनी योग्य स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना कोट्याधीश होण्यास अधिक वेळ लागत नाही. असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.काही स्टॉक कधीकाळी खूपच कमी किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता त्या स्टॉकच्या किमती वाढल्या आहेत.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्याच्या ‘या’ महापालिकेत निघाली मोठी भरती, थेट मुलाखतीने होणार उमेदवाराची निवड, पहा….

म्हणजे त्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना देखील चांगला परतावा दिला आहे. एमआरएफ कंपनीचा स्टॉक देखील आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यास आतापर्यंत सक्षम राहिला आहे. देशातील अग्रगण्य टायर बनवणारी MRF कंपनीचा स्टॉकही कधीकाळी मात्र अकरा रुपयावर ट्रेड करत होता.

पण आता हा शेअर चक्क एक लाख रुपयाच्या घरात पोहोचला आहे. हो, बरोबर ऐकताय तुम्ही MRF चा स्टॉक सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 99933.50 रुपयांवर ट्रेड करत होता. यामध्ये मंगळवारी घसरण झाली, मंगळवारी दुपारी हा स्टॉक 97 हजार 846 रुपयांवर ट्रेड करत होता.

निश्चितच, एकेकाळी अकरा रुपयाचा हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. एका आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षात हा स्टॉक 31 हजार 355 रुपयांनी वाढला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एमआरएफचा स्टॉक मे 2022 मध्ये 68 हजार 578 रुपयावर ट्रेड करत होता.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्यातील जिल्हा परिषद नोकरभरती साठी परीक्षेचे स्वरूप झाले जाहीर; किती प्रश्न राहतील, गुण किती, कशी राहणार प्रश्नपत्रिका? पहा…

आणि मे 2023 मध्ये हा स्टॉक 99,933.50 रुपयापर्यंत पोहचला आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षी मे महिन्यात या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल ते निश्चितच आतापर्यंत कोट्याधीश बनले असतील. 1993 मध्ये जेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर हा स्टॉक लिस्ट झाला तेव्हा त्याची किंमत मात्र 11 रुपये होती.

आणि आज जवळपास एक लाख रुपये या स्टॉक ची किंमत बनली आहे. यामुळे निश्चितच एमआरएफ च्या स्टॉकची चलती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दरम्यान तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआरएफचे स्टॉक स्पलीट नाही झाले त्यामुळे यामध्ये कायमच तेजी राहिली आहे.

मित्रांनो येथे दिलेली माहिती ही केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात आहे. ही माहिती गुंतवणुकीचा सल्ला नाही याची काळजी घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराशीं सल्ला-मसलत नक्की करा.

हे पण वाचा :- 8वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली भरती, पगार मिळणार 60 हजाराहून अधिक, पहा डिटेल्स