Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मुंबई-अहमदाबाद प्रवास आता होणार सुसाट आणि सुरक्षित; Mumbai-Ahmedabad हायवेवर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन भुयारी मार्ग, पहा…..

Mumbai Ahmedabad Highway : महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात मधील एक प्रमुख औद्योगिक शहर अहमदाबाद या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

प्रवासी प्रामुख्याने रस्ते मार्गे प्रवास करतात. यामुळे कायमच मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. काही भागात वाहतूक कोंडीही होते आणि काही ठिकाणी अपघात देखील मोठ्या प्रमाणात होतात.

अपघातप्रवण क्षत्रामुळे मुंबई अहमदाबाद हायवे वर प्रवास करणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम बनले आहे. आतापर्यंत या महामार्गावर शेकडो अपघात झाले असतील. परंतु आता या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! ‘अस’ झालं तर यंदाच्या मान्सून काळात कमी पाऊस पडणार; मान्सून प्रभावित होण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ?

मिळालेल्या माहितीनुसार आता या मार्गावरील अपघात थांबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तलासरी सीमा ते वर्सोवा पूल दरम्यान दहा फूटब्रिज आणि सहा भूमिगत भुयारी मार्ग विकसित करणार आहे. या कामाची आता पूर्व तयारी जवळपास पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

आता हे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे. हायवे पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फूटब्रिजमुळे आणि भूमिगत भुयारी मार्गामुळे महामार्ग लगत वसलेल्या गावातील नागरिकांना भयमुक्तरीत्या मार्ग क्रॉस करता येणार आहे.

शिवाय रात्री अपरात्री मार्ग क्रॉस करताना या नागरिकांना या ब्रिजचा आणि भुयारी मार्गाचा फायदा होणार आहे. यामुळे निश्चितच अपघाताची संख्या कमी होऊ शकते असं मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! एसटी महामंडळात ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल दिड लाख रुपये महिना, जाहिरात पहा

काही ठिकाण ब्लॅकस्पॉट घोषित केले

नुकतीच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये गुजरात सीमेपासून ते मीरा भाईंदरमधील वर्सोवा पुलापर्यंतची काही ठिकाणे ब्लॅकस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली.

त्यामध्ये तलासरी, कासा, आच्छाड, मनोर, वसई फाटा, विरार, धानिवरी, सोमटा, वाघोबा खिंड, मेंडवण, बापणे, चिंचोटी, लोधाधाम, पेल्हार, तुंगारेश्वर फाटा, रॉयल गार्डन, दुर्गा माता मंदिर, एचपी पेट्रोल पंप ध्वनी मार्ग, या स्थानांचा समावेश आहे.

दरम्यान आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दहा फूट ब्रिज आणि सहा भुयारी मार्ग तलासरी सीमा ते वर्सोवा पूल म्हणजेच ब्लॅक स्पॉट एरिया दरम्यान विकसित करणार असल्याने अपघातात घट येऊ शकते असं मत व्यक्त होत आहे. 

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! वंदे भारत एक्सप्रेसनंतर मिळणार आणखी एक मोठं गिफ्ट; ‘या’ महिन्यात सुरु होणार ही खास ट्रेन, असा राहणार रूट