मुंबई उच्च न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 52 हजार 400 रुपये महिना, पहा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai High Court Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांचे शिक्षण कमी झालेले असेल मात्र सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, चौथी पास उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत औरंगाबाद खंडपीठात नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद खंडपीठाने स्वयंपाकी या पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अशा परिस्थितीत आज आपण या भरतीबाबत आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पुन्हा ‘अस’ केल तर सरळ सेवेतून मुक्त करणार, होणार सक्तीची सेवानिवृत्ती, पहा शासनाचा नवीन निर्णय

कोणत्या पदासाठी आहे भरती

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत औरंगाबाद खंडपीठाने स्वयंपाकी अर्थातच कुक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान चौथी पास असावा. तसेच 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवारी यासाठी पात्र राहणार आहेत. रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार सुटणार आहे. तसेच उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवाराला स्वयंपाकाचे ज्ञान असणे गरजेचे असून त्यासंबंधीत अनुभव देखील आवश्यक आहे. उमेदवारास सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक असल्याचे सदर अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अर्ज कसा करावा लागेल?

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद या पत्त्यावर पाठवायचा आहे.

हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! BSF मध्ये निघाली भरती; घरबसल्या इथं करा अर्ज, पहा डिटेल्स

अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 2 मे 2023 पर्यंत आपला अर्ज वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवता येणार आहे. विहित कालावधीनंतर पाठवण्यात आलेल्या अर्जावर या ठिकाणी विचार केला जाणार नाही यामुळे विहित कालावधीमध्येच उमेदवारांना आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.

किती मिळणार पगार?

16600 ते 52 हजार 400 दरम्यान प्रति महिना वेतन निवड झालेल्या उमेदवाराला दिल जाणार आहे. याबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपण bombayhighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.

जाहिरात कुठं पाहणार

याची जाहिरात किंवा अधिसूचना पाहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ भरती 2023 या लिंकवर क्लिक करू शकता.

हे पण वाचा :- नाशिकच्या शेतकऱ्याचा नादखुळा! अंजीरच्या या जातीच्या लागवडीतून एका एकरात कमवलेत 3 लाख, पहा ही यशोगाथा