Mumbai Job News : मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) मध्ये नुकतीच भरती काढण्यात आली आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने कायदेशीर व्यवस्थापक या पदासाठी ही भरती काढली असून याची अधिसूचना देखील गेल्या महिन्यात निर्गमित झाली आहे.
यामुळे या पदासाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती?
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मुंबई बंदर प्राधिकरणाने काढलेल्या अधिसूचनेनुसार कायदेशीर व्यवस्थापक या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मात्र पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा एलएलबी पास आऊट असणे गरजेचे आहे. सोबतच वकील म्हणून लॉ फर्ममध्ये किंवा कोणत्याही PSU/सरकारी आणि व्यावसायिक संस्थेमध्ये कायदा अधिकारी/कार्यकारी म्हणून काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे देखील जरुरीचे आहे.
वयोमर्यादा?
35 वर्षापर्यंत वय असलेला उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहे. शिवाय रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देखील राहणार आहे.
किती मिळणार पगार?
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला 65 हजार रुपये प्रति महिना इतक वेतन दिले जाईल असे अधिसूचनेत नमूद आहे.
हे पण वाचा :- चमत्कार झाला ! गाईने दिला ‘सिंहाच्या बछड्याला’ जन्म; बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी, पहा Photo
अर्ज कसा करावा लागणार?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक अन पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्टल हाउस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक?
या पदासाठी कालपासून म्हणजे 26 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 मे 2023 पर्यंत या पदासाठी आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.
भरतीची जाहिरात?
याची जाहिरात पाहण्यासाठी आपण https://mumbaiport.gov.in/writereaddata/linkimages/1980210286.pdf या लिंक वर क्लिक करून जाहिरात पीडीएफ स्वरूपात पाहू शकणार आहात.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता डीएपी मात्र 600 रुपयात मिळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन डीएपी, पहा…