मुंबईकरांना अनुभवता येणार गारेगार प्रवास ! मुंबई लोकलबाबत केंद्र सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, पहा….

Ajay Patil
Published:

Mumbai Local Railway News : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते. लोकलने शहरातून तसेच उपनगरातून लाखो प्रवासी प्रवास करतात. दरम्यान या प्रवाशांना आता गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.

केंद्र शासनाने यासाठी आता पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारकडन आता लोकलचे एसी लोकल मध्ये रूपांतर केले जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने म्हणजे एमआरव्हीसीने यासाठी कंबर कसली आहे.

पारंपरिक लोकलला AC Local मध्ये रूपांतरीत करण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण करण्याचे काम सिस्टा कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी आता पुढील एका वर्षात याबाबतचा आपला अहवाल एमआरव्हीसीकडे सादर करणार आहे. एमआरव्हीसी मुंबई शहरी परिवहन प्रकल्प म्हणजे एमयूटीपी प्रकल्प राबवत आहे.

हे पण वाचा :- चिंताजनक ! हवामानात झाला मोठा बदल; बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाची शक्यता, ‘या’ तारखेला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने ‘एमयूटीपी -३ अ’ प्रकल्पासाठी सात हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार आता एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ एसी लोकल सुरु केल्या जाणार आहेत.

म्हणजे एकूण 238 एसी लोकल मुंबईत सूरु होणार आहेत. या प्रकल्पाला गेल्या सरकारच्या काळात प्रतिसाद मिळाला नाही. या सरकारने मात्र या प्रकल्पासाठी कर्ज उभरायला परवानगी दिली आहे. यामुळे आता 238 एसी लोकलचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता पारंपरिक लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर करण्यासाठी आता अभ्यास केला जाणार आहे. म्हणजे आता सिस्टा कंपनीच्या अभ्यास अहवालानंतर याबाबत धोरण ठरवले जाणार आहे. अर्थातचं आता मुंबईमधील लोकल प्रवाशांना लवकरच एसी लोकलने प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

हे पण वाचा :- आठवी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! भारतीय पोस्टात निघाली विविध पदासाठी भरती, मुंबईत असणार नोकरीची संधी, आजच करा अर्ज

दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत नव्या एसी लोकल एक किंवा दोन येत होत्या. म्हणजे यांची संख्या कमी होती. पण एमयूटीपी प्रकल्पानुसार आता भविष्यात नव्या एसी लोकलची संख्या वाढणार आहे.

अशा परिस्थितीत नव्या एसी लोकलची संख्या वाढल्यानंतर या एसी लोकल सरळसेवेत दाखल करतांना प्रवाशांची गैरसोय होणार नाही, वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. यासाठी पूर्वतयारी करण्याच काम सध्या सुरु आहे.

सर्व पारंपारिक लोकल वातानुकूलित म्हणजे एसी लोकलमध्ये रूपांतरित झाल्यानंतर सामान्य प्रवाशांसमोर भाड्याचा प्रश्न देखील उभा राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या उपनगरीय एसी लोकलची संख्या वाढल्यास एसी लोकलचे तिकीट दर कमी केले जाऊ शकते. निश्चितचं तिकीट दर कमी राहिल्यास एसी लोकलचा प्रवास परवडणारा असेल आणि याला प्रवाशी पसंती दाखवतील.

हे पण वाचा :- मुंबईमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MMRDA मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा याविषयी सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe