Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राजधानी मुंबई म्हणजेच मायानगरी ज्याला अनेक जण स्वप्ननगरी देखील म्हणतात, या स्वप्ननगरीत घर घेणं म्हणजे जणू काही दिवसाढवळ्या स्वप्न पाहण.
कारण की मुंबईमध्ये गेल्या काही दशकात घरांच्या किमती एवढ्या विक्रमी वाढल्या आहेत की आता मध्यमवर्गीय लोक म्हाडाने उपलब्ध करून दिलेल्या घरांची आतुरतेने वाट पाहतात. म्हणून मुंबईमध्ये म्हाडाने काढलेल्या घर सोडतीला कायमच लाखोच्या संख्येने अर्ज पडले आहेत.
दरम्यान, म्हाडाने मुंबई मंडळाची घर सोडत जाहीर केली आहे. मुंबई मंडळाने 4 हजार 83 घरांसाठी ही सोडत काढली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या घर सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन नेव्ही मध्ये तब्बल 372 रिक्त पदांसाठी निघाले भरती, अर्ज कुठं करणार? पहा…
आम्ही आपणास सांगू इच्छितो की म्हाडा मुंबई मंडळाने 2019 मध्ये यापूर्वी घरांसाठी लॉटरी काढली होती. तेव्हापासून मुंबई मंडळाने लॉटरी काढलेली नाही यामुळे मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांकडून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या घर सोडतिला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांनी लोकसत्ता वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळच्या या 4083 घरांसाठी 22 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरात निघाली की लगेचच अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
मग इच्छुक व्यक्तींना 26 जून 2023 पर्यंत आपला अर्ज अनामत रकमेसह भरता येणार आहे. यानंतर मग पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल. आणि मग 18 जुलै 2023 रोजी मुंबई मंडळाच्या 4083 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- तुम्ही घरात किती रोकड रक्कम ठेऊ शकतात? घरात अधिक कॅश ठेवल्यास काय होते ? आयकर विभागाचा नियम वाचाच !
कुठल्या घरांचा राहणार समावेश
या लॉटरीमध्ये अत्यल्प – २७८८, अल्प – १०२२, मध्यम – १३२, उच्च – ३८, विखुरलेली – १०२ अशी एकूण 4083 घरांचा समावेश राहणार आहे. यापैकी 2788 घरे ही गोरेगाव येथील पहाडी, अँटॉप हिल, विक्रोळीचे कम्मनवार नगर या भागात राहणार आहेत. याशिवाय अल्पगटातील 1022 घरे गोरेगावमधील पहाडी, दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), पत्राचाळ, जुने मागाठाणे (बोरिवली), चारकोप, कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाडा आदी ठिकाणी राहणार आहेत. मध्यम गटातील 132 घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर), कांदिवली या भागातील आहेत. उच्च उत्पन्न गटातील 39 घरे ताडदेव, लोअर परळ, शीव, शिंपोली, तुंगा पवई आदी भागातील राहणार आहेत. अत्यल्प गटासाठी घरांच्या किमती ह्या साधारण 31 लाख ते 40 लाखांपर्यंत आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….
म्हाडा मुंबई मंडळाच्या घर सोडतीचे वेळापत्रक खालील प्रमाणे
जाहिरात केव्हा निघणार :- 22 मे 2023 रोजी म्हाडा जाहिरात काढणार आहे
अर्ज विक्री आणि स्वीकृती केव्हा :- म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जाहिरात ज्या दिवशी निघेल त्याच दिवसापासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अनामत रक्कमेसहं अर्ज करण्याची मुदत :- इच्छुक लोकांना आपला अर्ज अनामत रकमेसह 26 जून 2023 पर्यंत सादर करता येणार आहे.
लॉटरी केव्हा निघणार :- 18 जुलै 2023 रोजी म्हाडाच्या या चार हजार 83 घरांसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सदन या ठिकाणी लॉटरी काढली जाणार आहे.
निश्चितच, आता मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना पैसे जमवण्यासाठी तसेच कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी तयारीला लागावे लागणार आहे. गेल्या एका वर्षांपासून ज्या मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या घराच्या लॉटरीची वाट पाहिली जात होती ती लॉटरी आता 22 मे 2023 रोजी जारी होणार आहे.
हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पैसे नसले तरीही रेल्वेचे तिकीट बुक करता येणार, भारतीय रेल्वेने सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा, पहा…