Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मुंबईमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MMRDA मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा याविषयी सविस्तर

Mumbai MMRDA Recruitment : मुंबईमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एम एम आर डी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून एक भरती आयोजित झाली आहे. यासाठी प्राधिकरणाने नुकतेच एक अधिसूचना देखील निर्गमित केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार संचालक (वित्त), संचालक (देखभाल), महाव्यवस्थापक (देखभाल) या पदांच्या रिक्त जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10वी, 12वी चे निकाल, वाचा सविस्तर

कोणत्या आणि किती जागांसाठी होणार भरती?

संचालक (वित्त), संचालक (देखभाल), महाव्यवस्थापक (देखभाल) या तीन पदांसाठी ही भरती होणार असून या तिन्ही पदांच्या प्रत्येकी एक जागा अशा एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक अहर्ता

या तिन्ही पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यां उमेदवारांनी संबंधित विषयातील शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून त्या संबंधित अनुभव देखील उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा लागणार

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. https://mmrda.maharashtra.gov.in/home या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! पंजाब डख यांनी ‘या’ जिल्ह्यात वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता, पहा….

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार या पदासाठी उमेदवारांना दोन जून 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. विहित कालावधीनंतर अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद मात्र उमेदवारांना घ्यायची आहे.

मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीची सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे एक जरुरीचे आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार जर उमेदवाराकडे पात्रता असतील तरच उमेदवाराने आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करायचा आहे.

हे पण वाचा :- मुंबईमधील चाकरमान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनबाबत रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता…..