Mumbai Municipal Corporation Recruitment 2023 : मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा भरती आयोजित झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महापालिकेतील 35 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना 23 मार्च 2023 रोजी निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन या ठिकाणी केले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या भरती संदर्भात काही महत्त्वाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती आहे, यासाठी अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक तसेच वेतन किती राहणार? यांसारख्या इतर काही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी आयोजित झाली भरती
महापालिकेच्या माध्यमातून 23 मार्च 2023 रोजी आहार तज्ञ या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आहार तज्ञ पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. http://www.portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी मात्र एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असेल.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक?
या भरतीसाठी उमेदवारांना 4 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अर्थातच आणखी दोन दिवस उमेदवारांकडे अर्ज सादर करण्यासाठी शिल्लक आहेत. यामुळे या पदासाठी पात्र राहणाऱ्या आणि अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लवकरच यासाठी अर्ज करायचा आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो चिंता नसावी; ‘या’ 6 कारणामुळे कापूस दर वाढणार; तज्ञांचा अंदाज, पण…..
शैक्षणिक पात्रता नेमकी काय
या पदासाठी Bsc (आहारतज्ज्ञ) पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. सोबतच UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून न्यूट्रिशन व डाएटिक्स मध्ये डिप्लोमा/ Msc/ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे यासाठी बंधनकारक आहे. तसेच संबंधित उमेदवाराला कम्प्युटरचा बेसिक नॉलेज असताना आवश्यक असून यासाठी शासनमान्य एमएससीआयटी चा कोर्स केलेला असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कमाल 40 वर्षाचा असावा.
किती मिळणार पगार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 1200 रुपये प्रति दिवस इतकं वेतन राहणार आहे.