Mumbai News : देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचे काम जोमात सुरू आहे. यामध्ये रस्ते विकासाची कामे प्रामुख्याने केली जात आहेत. यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे. आता देशातील पहिला-वहिला समुद्र खालील बोगदा देखील तयार होत आहे.
विशेष म्हणजे हा बोगदा देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी राजधानी मुंबईत तयार होत आहे. निश्चितच ही मुंबईसाठी आणि सबंध महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबईमध्ये तयार होणारा हा बोगदा उत्तरेकडील अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मलबार हिलच्या खाली सुरू होतो आणि ब्रीच कँडी पार्क इथं सपंतो.
हा बोगदा मुंबईमधील कोस्टल रोड प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोस्टल रोड प्रकल्पा अंतर्गत तयार होणाऱ्या या बोगद्यामुळे मुंबईमधील गिरगाव ते वरळी या दरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे.
खरं पाहता सध्या गिरगाव ते वरळी हे अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटे प्रवास करावा लागतो. मात्र हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर अर्थातच कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ दहा मिनिटात पार करता येणार आहे. निश्चितच या प्रकल्पामुळे मुंबईमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! म्हाडाच्या घरासाठी कोण अर्ज करू शकत? अर्ज कुठं करावा लागणार? वाचा याविषयी ए टू झेड माहिती
किती झालाय खर्च
हाती आलेल्या माहितीनुसार या बोगद्याच्या कामासाठी बारा हजार 721 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे निश्चितच मुंबईमधील रस्ते व्यवस्था मजबूत होणार आहे. हा बोगदा 10.58 किमी लांब आहे. हा बोगदा मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बोगद्याची विशेषता काय?
हा देशातील पहिलाच समुद्र खालील बोगदा राहणार आहे.
समुद्राखालील हा बोगदा तयार करण्यासाठी फायबर ग्लासचा वापर करण्यात आला आहे. यामुळे या बोगद्यातून प्रवास करताना जणूकाही समुद्रातूनच प्रवास केला जात आहे असा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.
या बोगद्याचा जवळपास एक किलोमीटरचा भाग हा समुद्राखालील राहणार आहे.
या बोगद्याचा व्यास १२.१९ मीटर आहे. तर त्याची खोली ही समुद्रसपाटीपासून १७-२० मीटर आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मलबार हिलमधील बोगद्याचा भाग हा 72 मीटर खोल असणार आहे.
बोगद्याच्या आतमध्ये 6 क्रॉसिंग विकसित करण्यात आले आहेत. यामध्ये पादचाऱ्यांसाठी चार तर दुचाकीस्वारांसाठी दोन मार्ग असणार आहेत.
टनेलमध्ये 3.2 मीटरच्या 3 लेन विकसित होणार आहेत.
यातली तिसरी लेन ही आपतकालीन व्यवस्थेसाठी वापरली जाणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- मुंबई, नागपूर, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ एक्सप्रेस ट्रेन रद्द, पहा यादी
केव्हा सुरू होणार बोगदा?
मिळालेल्या माहितीनुसार या बोगद्याचे काम नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. यानंतर हा बोगदा खुला होईल अशी माहिती समोर येत आहे. हा बोगदा सुरू झाल्यानंतर गिरगाव ते वरळी हे अंतर मात्र दहा मिनिटात पार करता येणार आहे.
सध्या हेच अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटांचा म्हणजेच पाऊण तासाचा कालावधी लागतो. निश्चितच बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा जवळपास 30 ते 35 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे या बोगद्याचे काम नेमकं केव्हा पूर्ण होणार याकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष लागून आहे.