मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ लिंक रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईचा प्रवास होणार मात्र 25 मिनिटात, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : नवी मुंबई मधील वाहतूक व्यवस्था सुरळीत अन बळकट करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच सिडकोच्या माध्यमातून शहरात विविध रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

यामध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे-बेलापूररोड, पामबीच आणि शीव-पनवेल या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी देखील सिडको ने पुढाकार घेतला आहे.

सिडको कडून या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तुर्भे-खारघर दरम्यान लिंकरोड तयार केला जाणार आहे. यासाठी जवळपास 2200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित राहणार आहे.

हे पण वाचा :- बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याचे टेंडर मेघा कंपनीला मिळाले; केव्हा सुरु होणार या भूमिगत मार्गाचे काम, पहा….

विशेष बाब म्हणजे सिडकोकडून हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मात्र तीन वर्षात या प्रकल्पाला मूर्त रूप देण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. अर्थातच जर हा प्रकल्प येत्या वर्षात सुरू झाला तर 2017 पर्यंत या मार्गांवर वाहने धावतील अशी शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणेकरांना नवी मुंबई मधील खारघरला केवळ 30 मिनिटात पोहचता येणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून नवी मुंबई शहरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा लिंक रोड तयार केला जाणार आहे.

हे पण वाचा :- शेअर मार्केटमध्ये एक सामान्य व्यक्ती किती रुपये गुंतवू शकतो? काय आहेत शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे सरकारी नियम, पहा…

कसा राहणार तुर्भे-खारघर लिंक रोड

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा सहा किलोमीटर लांबीचा लिंक रोड राहणार आहे. हा एक चार पदरी मार्ग असेल. या प्रकल्प अंतर्गत एक 1.76 किलोमीटर लांबीचा बोगदा देखील तयार केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या माध्यमातून तुर्भे येथून खारघरमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा लिंक रोड एलिव्हेटेड किंवा ग्रेड-लेव्हल पद्धतीने तयार होणार आहे.

सिडको ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर हा प्रकल्प सुरू होईल आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतर मात्र तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.

हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा