मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ हायवेवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने दोन मार्गीका झाल्यात बंद, पर्यायी मार्ग कोणता?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Pune Travel : मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि पुणे राज्याचे सांस्कृतिक राजधानी साहजिकच या दोन कॅपिटल शहरांमध्ये रोजाना हजारो प्रवासी बाय रोड प्रवास करत असतात. मुंबईहून पुण्याकडे तसेच सातारा कोल्हापूर आणि बेंगलोर या शहरांकडे जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गाचा वापर केला जातो.

हा हायवे कायमच वर्दळीचा राहिला आहे. या महामार्गावर कायमच वाहनांची गर्दी होत असते यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी देखील अनेकदा पाहायला मिळाली आहे. शिवाय वाहनांची संख्या वाढली असल्याने या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

अशा परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या महामार्गावरील नेरूळ एलपी उड्डाणंपुलावर काँक्रिटीकरणाचे काम करणार आहे. वारंवार पडणारे खड्डे अन त्यामुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग आणि होणारे अपघात या सर्व पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलावर काँक्रिटीकरणाचे काम करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

यानुसार 22 एप्रिल 2023 अर्थातच कालपासून काँक्रिटीकरणाच्या कामाला शुभारंभ झाला असून यानुसार या नेरूळ एलपी उड्डाणपुलाच्या दोन मार्गीका देखील बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन मार्गीका या कामासाठी बंद करण्यात आल्या असून पुढील एक महिना म्हणजेच जवळपास 22 मे 2023 पर्यंत या मार्गीका बंद राहणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे.

म्हणजेच या नेरूळ एलपी उड्डाणपुलावर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी एक मार्गिका सुरू आहे. परंतु वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वाहतूकदारांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हलक्या वाहनांनी पामबीच मार्गाचा वापर करावा आणि जड वाहनांनी शक्यतो या मार्गावरून जाणे टाळावे असं वाहतूक पोलिसांकडून सांगितलं जात आहे. मुंबई अन ठाणेकडून पुण्याकडे जाणारी वाहने शिरवणे एमआयडीसी सर्व्हिस रोडवरून खिंडीमार्गे वळवण्यात आली असून शिरवने जंक्शन, एल पी जंक्शन येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

एकंदरीत सायन पनवेल या महत्त्वाच्या महामार्गावरील या उड्डाणपुलावर दुरुस्ती कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आली असल्याने याचा या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.