Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

राजधानी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली मोठी भरती; पहा भरतीची सविस्तर माहिती

Mumbai Sarkari Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विशेषता मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

Mumbai Sarkari Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विशेषता मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राजधानी मध्ये नोकरी करण्याच अनेकांचे स्वप्न आहे मात्र आता यापैकी अनेकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कारण की मुंबईमध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून भरतीसाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या भरतीच्या  माध्यमातून तब्बल 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांनी काढलेल्या भरतीची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा तपशील वार प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- संभाजीनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! गव्हाच्या शेतीतून मिळवलं तब्बल 76 क्विंटलच हेक्‍टरी उत्पादन, पहा असं काय केलं?

कोणत्या पदासाठी काढण्यात आली आहे भरती?

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदाच्या 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबाबत अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचा. अधिसूचनेत दिलेल्या पात्रता असलेल्या उमेदवारास या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी करावी लागणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त ‘ही’ तीन कामे केली की लगेचच सुधारतो सिबिल स्कोर, पहा कोणती आहेत ही कामे?

अर्ज कसा करायचा

अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2023/ORS/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित पदासाठी अर्ज करू शकणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आठ एप्रिल 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार

https://www.rcfltd.com/files/Apprentice%20Advt%202023%20(31_03_2023).pdf या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीची जाहिरात किंवा अधिसूचना डाऊनलोड करू शकतील.

या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा मात्र अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. 

हे पण वाचा :- 2025 पर्यंत सुरू होणार ‘हे’ पाच महामार्ग; महाराष्ट्रातील समृद्धी अन जगातील सर्वाधिक लांबीच्या ‘या’ महामार्गाचा पण आहे समावेश, पहा….