Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला सुरु होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, पीएम मोदी करणार उदघाट्न

Mumbai Trans Harbour Link : मुंबई राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. हे कॅपिटल शहर आपल्या वैभवासाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. विशेष म्हणजे मुंबई शहराच्या वैभवगात आणखी भर पडणार आहे. मुंबई शहराची कनेक्टिव्हिटी आता आणखी सोपस्कार होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे मुंबई बेट आणि नवी मुंबई थेट जोडले जाणार आहे. साहजिकच या प्रकल्पामुळे स्वप्ननगरी, मायानगरी मुंबईच्या वैभवात भारत पडणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद होणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. बुधवारी अर्थातच काल 24 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे उद्घाटित करू असे सांगितले आहे.

शिंदे यांनी हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पित करावा यासाठी मी त्यांना विनंती करणार असे यावेळी सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात सामान्य जनतेसाठी खुला करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

फडणवीस यांनी या सागरी सेतूमुळे आर्थिक बाजू बळकट होईल तसेच मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास वीस मिनिटात पूर्ण होईल असे यावेळी सांगितले. हा पूल मुंबईहून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी महत्वाचा असून गेली तीस वर्षे या पुलाची चर्चा होती मात्र मोदी सरकारच्या काळात हा पुल तयार झाल्याचे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

कसा आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

हा 22 किलोमीटर लांबीचा सागरी पूल आहे. हा पूल तीन अधिक तीन अशा सहा लेनचा आहे. या पुलाची सर्वात मोठे विशेषता म्हणजे या पुलाचा 16.5 किलोमीटरचा टप्पा हा समुद्रावर आहे. उर्वरित म्हणजेच साडेपाच किलोमीटरचा टप्पा हा मुख्य भूमीवर आहे. या प्रकल्पाचे काम एकूण चार टप्प्यात केले जात आहे.

या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला मुंबईच्या बाजूने शिवडी आणि नवी मुंबईच्या बाजूने शिवाजीनगर आणि चिर्ले येथे इंटरचेंज देण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे सध्या 94% काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

यामुळे हा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री महोदय यांनी हा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे नमूद केले असून या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करू असे देखील सांगितले आहे.