आता मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात; देशातला सर्वात मोठा सागरी पूल ‘या’ दिवशी होणार सुरू

Ajay Patil
Published:
Mumbai Trans Harbour Link

Mumbai Trans Harbour Link : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.

यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील अंतर कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. दरम्यान या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या तीन ते चार दिवसात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

25 ते 26 मे दरम्यान या प्रकल्पाचे पूर्ण काम होईल असा आशावाद एम एम आर डी ए च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लवकरच मुंबईकरांसाठी याचे लोकार्पण केले जाणार आहे.

हे पण वाचा :- ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते, कोणता फॉर्मुला वापरला जातो, तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळू शकते? पहा….

या प्रकल्पांतर्गत एकूण 22 किलोमीटर लांबीचा पूल तयार केला जात असून यापैकी साडेपाच किलोमीटर लांबीचा पूल जमिनीवर राहणार आहे तर साडेसोळा किलोमीटर लांबीचा पूल हा समुद्रावर तयार करण्यात आला आहे. हा समुद्रावरील देशातील सर्वात लांब पूल म्हणून ओळखला जाणार आहे.

या सागरी सेतूमुळे मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे. दरम्यान टाइम्स वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या पुलाचे डेक चे काम पूर्ण झाल्यानंतर हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

या पुलावरून रोजाना 70000 वाहने भरधाव वेगाने धावतील अशी आशा आहे. निश्चितच या पुलांमुळे मुंबईकरांचा नवी मुंबईकडील प्रवास सोयीचा होणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! दहावी, बारावी बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; महाराष्ट्र राज्य बोर्ड करणार तारखेची घोषणा

फक्त नवी मुंबईच नाही तर या पुलामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास देखील गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प NH 348 या नॅशनल हायवे ला जोडला जाणार आहे. म्हणजे हा मार्ग पुढे चिर्लेहून पळस्पे फाट्यापर्यंत उड्डाणपुलाद्वारे मुंबई-पुणे एक्स्प्रेसशी जोडला जाणार आहे.

यामुळे मुंबईकरांना मुंबईहून पुणे मात्र 90 मिनिटात गाठता येणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा देशातील सर्वात लांब सागरी पूल विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने 18000 कोटी रुपयांचा खर्च केला असून आगामी काही दिवसात हा देशातील सर्वात लांब सागरी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ शाळांचे वेळापत्रक बदलणार, 2 सत्रात भरणार शाळा; मंत्री गावित यांची माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe