Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…

सध्या नागपूर ते हैदराबाद दरम्यान ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत त्या ट्रेनला हा प्रवास करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागतो. मात्र वंदे भारत एक्सप्रेसमुळे अवघ्या साडेसहा तासात हा प्रवास शक्य होणार आहे.

Nagpur Railway News : नागपूरसहित संपूर्ण विदर्भवासियांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नागपूर-बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता विदर्भाला नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसची देखील मोठी भेट केंद्र शासनाकडून दिली जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी गेल्या वर्षी म्हणजेच 20 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले होते. त्यावेळी अश्विनी वैष्णव यांनी यावर सकारात्मकता दाखवली होती.

दरम्यान अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून आता या मार्गावर ही सुपरफास्ट ट्रेन चालवण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे आता या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुसाट धावणार असल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- म्हाडा मुंबई लॉटरी : 50 हजार पगार असलेल्या लोकांनाही Mhada चे अत्यल्प गटातील घर दुरून डोंगर साजरेच, आता पर्याय काय? घरासाठी किती कर्ज मिळू शकत? पहा….

प्रवाशांच्या वेळेत होणारा बचत

आपल्या माहितीस्तव आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, सध्या नागपूर ते हैदराबाद दरम्यान ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत त्या ट्रेनला हा प्रवास करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागतो. मात्र वंदे भारत एक्सप्रेसमुळे अवघ्या साडेसहा तासात हा प्रवास शक्य होणार आहे.

साहजिकच या मार्गावरील प्रवाशांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना या ट्रेनचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कस राहणार या ट्रेनचे वेळापत्रक?

यासंदर्भात अधिकारी माहिती रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून समोर आलेली नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन सकाळी सहा वाजता नागपूर स्थानकावरून सुटणार आहे आणि दुपारी साडेबारा वाजता ती हैदराबादला पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी हैदराबादहुन दुपारी दीड वाजता निघणार आणि रात्री आठ वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय ! जमीन NA करण्यासाठी आता महसूल विभागाकडे जाण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीने जमिनी होणार NA, वाचा याविषयी सविस्तर

या ठिकाणी राहणार थांबा?

या गाडीला बल्लारशहा, सिरपूर, कागजनगर, रामगुंडम, काझीपेठ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोबतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या गाडीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावर देखील थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांनी या गाडीला सेवाग्राम येथे थांबा मिळावा म्हणून खासदार रामदास तडस यांच्याकडे मागणी केली होती आणि तडस यांनी ही मागणी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली असून आता सुधीर मुनगंटीवार यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहेत.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….