नगरचे नाव अंबिकानगरच करा ! शिंदे साहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेला हरताळ फासणे म्हणजे त्यांचे नेतृत्व अमान्य करताय का ?। Ahmednagar Name Change

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Name Change :- नगरचे नाव अहिल्यादेवी नगर न करता अंबिका नगरच करा असा सल्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. १९९५ साली नगरच्या वाडीया पार्क मैदानावर झालेल्या विराट सभेत आमचे आणि आपलेही श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते.

त्या घोषणेला शिंदे साहेब तुम्ही हरताळ फासत आहात. म्हणजे त्यांचे नेतृत्व तुम्ही अमान्य करता आहात का? केवळ मतांच्या राजकारणापायी शिवसेनाप्रमुखांचा आदेश तुम्ही मानत नाहीत आहात याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा असा खोचक सवाल गिरीश जाधव यांनी विचारला आहे.

दिल्ली येथील महाराष्ट्र भावनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यातआले. यावरून महाराष्ट्रभर गदारोळ झाला ही राजकीय चूक झाकणासाठी शहराची नावे बदलण्याचा खटाटोप राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केला.

नगर शहराचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नगरला देऊन अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी आपण सामान्य नगरकरांना विश्वासात घेतले होते का?

केवळ धनगर समाजाची मतं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याचा घाट घालण्यात आला यश संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी पत्रक काढून निषेध नोंदवला आहे.

त्यांनी म्हटले आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत पण नगरला देखील 533 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे आणि निजामशाहीत अहमदनगर अहमदनगर हे शहर वसवण्यात आले.

नगर शहरापासून जवळच बुऱ्हानगर हे अंबिका मातेचं जागृत ठाण आहे. तुळजाभवानीच्या जगदंबा मातेचं हे माहेर आहे. असा पुराणात आणि देवी माहात्म्यात उल्लेख आहे. त्यामुळे नगरचे नाव बदलून पाहिल्यानंतर ऐवजी अंबिकानगरच करणे अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे नगर शहराच्या विकासात राज्य सरकारने कोणते योगदान दिले आणि नगर शहराला किंवा जिल्ह्याला असे विशेष काय दिले की ते परस्पर नगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा हक्क सांगतात.

धनगर समाजाच्या भावना यांचा आम्ही आदरच करतो पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे सुंदर शहरे बनवली. त्याप्रमाणे नगर जवळ एक स्मार्ट सिटी उभारून त्याला त्यांचे नाव दिले असते तर छान झाले असते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शहरांची नावे बदलण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी मध्ये या नामांतराला स्थगिती दिली आहे.

वास्तविक धाराशिव, संभाजीनगर ही नावे बदलण्याची घोषणा अनेक वेळा झाली पण ती प्रत्यक्षात उतरली नाहीत. त्यावरून सत्तांतर झाले आणि पुन्हा नावे पूर्ववत झाली. नगरबाबतही तेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पोळी न भाजता नगर चे नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार अंबिकानगर करावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे.