Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

नाशिक निओ मेट्रो प्रकल्पाबाबत मोठ अपडेट; आता नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे रवाना, 1100 कोटी रुपयांचा होणार खर्च, पहा संपूर्ण रूट

Nashik Neo Metro New Project : नासिकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मेट्रो मार्ग प्रकल्प. या मेट्रो मार्ग प्रकल्पाची घोषणा वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओची घोषणा झाली म्हणून नाशिककरांना मेट्रोचा अनुभव घेता येईल असा आशावाद व्यक्त होत होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष बाब म्हणजे 2020 मध्ये या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद देखील केली. यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशा 2020 मध्ये व्यक्त होत होती. परंतु आता 2023 संपत चालला मात्र या निओ मेट्रोमार्ग प्रकल्पाचा नारळ अद्याप फुटलेला नाही.

हे पण वाचा :- सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

यामुळे या प्रकल्पाबाबत नाशिककरांमध्ये अनिश्चितता आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री महोदय यांनी या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा हालचाली वाढवल्यात. नासिक मध्ये भाजप कार्यकारिणीच्या एका बैठकीत फडणवीस यांनी हा प्रकल्प येत्या तीन महिन्यात सुरु होईल अशी भविष्यवाणी केली होती.

विशेष म्हणजे यासाठी लगेचच केंद्रीय स्तरावर हालचाली वाढल्या होत्या. या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची बैठक देखील दिल्लीमध्ये पार पडली होती. मात्र या प्रकल्पाला केंद्रीय स्तरावरून परवानगी मिळालेली नाही. यामुळे जोपर्यंत या प्रकल्पाला केंद्राकडून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत याचा नारळ फुटणार नसल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ बहुचर्चित उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला, आता ‘या’ महिन्यानंतर सुरु होणार, पहा….

अशातच, नाशिक निओ मेट्रो मार्ग संदर्भात एक नवीन डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्र राज्य शासनाने नासिक रोड ते सीबीएस दरम्यान प्रायोगिक तत्वावरील नवीन टायरबेस मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी राज्य शासनाने तब्बल 1100 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. आधीचा मूळ प्रस्ताव केंद्र शासनाने स्वीकृत केलेला नाही. मात्र आता नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडून पाठवण्यात आला आहे. म्हणून आता या मेट्रो मार्ग प्रकल्पासंदर्भात संभ्रमावस्था नासिककरांमध्ये पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन आठ ई-शिवाई बस एसटीच्या ताफ्यात दाखल; ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार सेवा

कसा आहे नवीन प्रस्तावित निओ मेट्रो मार्ग प्रकल्प

राज्य शासनाने केंद्राकडे नुकताच पाठवलेला नवीन निओ मेट्रो मार्ग प्रकल्प सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड असा प्रस्तावित करण्यात आला आहे. हा एक प्रायोगिक तत्त्वावरील मार्ग राहणार आहे. हा १०.४४ किलोमीटर लांबीचा मार्ग असून प्रायोगिक तत्वावर टायरबेस मेट्रो यावर चालविली जाणार आहे.

त्यासाठी राज्य शासन ११०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. यामुळे आता केंद्राकडून या प्रकल्पाला मान्यता मिळते का? जुन्या निओ मेट्रो मार्ग प्रकल्पाचे काय होणार? यासारखे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

हे पण वाचा :- ‘हा’ शेअर ठरला कुबेरचा खजाना ! फक्त 8 वर्षात 1 लाखाचे झालेत 3 कोटी 70 लाख, पहा कोणता आहे तो बाहुबली स्टॉक?