देशातील पहिली निओ मेट्रो महाराष्ट्रात ! निओ मेट्रो प्रकल्पाबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिल्यात ‘या’ सूचना, पहा काय म्हटलं पीएमओने

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Neo Metro Project Maharashtra : पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता राज्यात सध्या रस्ते विकासाची कामे जलद गतीने सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यासोबतच महाराष्ट्राला वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची चौकात देखील भेटत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत.

दरम्यान आता राज्याला आणखी एक भेट केंद्र शासनाकडून दिली जाणार आहे. राज्यात आता निओ मेट्रो धावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. हा देशातील पहिला निओ मेट्रो प्रकल्प वाईन सिटी म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त असलेल्या नाशिक मध्ये साकारला जाणार आहे.

हे पण वाचा :- 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची शेवटची यादी आली; पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ, तुम्ही पण आहात का यादीत, पहा

खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक मध्ये आयोजित भाजपा कार्यकारणीच्या बैठकीत नासिक येथील निओ मेट्रो संदर्भात मोठी अपडेट दिली होती. या भाजपा कार्यकारणीच्या बैठकीत फडणवीस यांनी पुढील दोन महिन्यात हा मेट्रो मार्ग प्रकल्प मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान आता या प्रकल्पाबाबत केंद्राकडून हालचाली तेज झाल्या आहेत. आपल्या राजकीय वजनाचा वापर करत हा मेट्रो मार्ग प्रकल्प फडणवीस जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्याचा नादखुळा ! विदर्भातल्या मातीत फुलवली स्ट्रॉबेरीची बाग; मिळवलं लाखोंचं उत्पन्न

हेच कारण आहे की पीएमओ कार्यालयाकडून nashik निओ मेट्रो प्रकल्पाचा अहवाल मागवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात या प्रकल्पाबाबत सर्व तांत्रिक माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या अहवालात मल्टी मॉडेल हब संदर्भात देखील आवश्यक माहिती नमूद असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच पीएमओ अर्थातच पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकल्पाबाबत अहवाल मागविण्यात आला असल्याने या प्रकल्पाची चाके आता पुढे जात असल्याचे चित्र असून हा प्रोजेक्ट लवकरच मूर्त रूप घेईल अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे.

कशी आहे नाशिकची निओ मेट्रो

नाशिक मध्ये मेट्रो सुरू व्हावी ही नाशिककरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून वारंवार प्रयत्न होत आहेत. दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नासिक मध्ये जी मेट्रो सुरु होणार आहे ती एक टायर बेस मेट्रो असून हा निओ मेट्रो प्रकल्प देशातीलं पहिला-वहिलाच प्रकल्प आहे.

या प्रकल्पाला दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने मान्यता दिली होती. राज्य शासनाच्या मान्यता नंतर हा प्रकल्प केंद्राकडे सादर झाला. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या सर्व गोष्टी प्रकल्पाच्या अनुरूप भासत असल्या तरी देखील या प्रकल्पाची अद्याप सुरुवात झालेली नाही.

हे पण वाचा :- पुणे-मुंबई प्रवास होणार गतिमान ! देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ‘या’ दिवशी होणार खुला, प्रवाशांचा 90…

गेल्या दोन वर्षापासून केंद्रकडे विचाराधीन असलेला आणि अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची निधी मंजूर झालेला शासनाचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प नेमका जलद गतीने का सुरू होत नाही हाच प्रश्न नाशिककरांना आहे. अद्याप या प्रकल्पाचे नारळ देखील फुटलेले नसल्याने दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री यांच्या स्वप्नातला हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही याबाबत नाशिककर संभ्रमाअवस्थेत सापडलेले आहेत. मात्र आता या प्रकल्पाबाबत पंतप्रधान कार्यालयातीलं सल्लागार सचिवांकडून सविस्तर प्रकल्प अहवाल आणि या प्रकल्पाची तांत्रिक माहिती मागवली असल्याने या प्रकल्पाचा नारळ निश्चितच येत्या काही दिवसात फुटेल आणि हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

यासोबतच सचिवांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत महामेट्रो, महारेल आणि महापालिका आयुक्तांची व्हीसी कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा देखील केली आहे. विशेष बाब म्हणजे याव्यतिरिक्त नाशिककरांसाठी अति महत्त्वाचा अशा मल्टी मॉडेल हब संदर्भात देखील यावेळी चर्चा झाली आहे. हा मल्टीमॉडेल हब नासिक रोडच्या सिन्नर फाटा या ठिकाणी विकसित होणार आहेत. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना ज्या निओ मेट्रोची आतुरता आहे तो प्रकल्प लवकरच आता मृत रूप घेईल आणि देशातील पहिली टायर बेस मेट्रो वाईन सिटी नाशिकच्या वैभवात भर घालेल असा आशावाद या निमित्ताने जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- State Employee Strike : ब्रेकिंग ! कर्मचाऱ्यांचा संप फुटला; आता ‘या’ मोठ्या संघटनेने संपातून घेतली माघार