Soybean Market Price: आता झाली आहे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ! परंतु या हंगामात टिकेल का ही दरवाढ?

केंद्र सरकारचा खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णयाच्या बाबतीत जर बघितले तर या निर्णयाचे काहीसे सकारात्मक परिणाम स्थानिक बाजारपेठेमध्ये दिसायला लागले असून सोयाबीनच्या सरासरी दरांमध्ये काहीशी सुधारणा झालेली असून हे दर 690 रुपयांनी वधारून 4705 रुपयांवर गेले आहेत. परंतु जर सरकारचा हमीभाव पाहिला तर त्या तुलनेत मात्र अजूनदेखील 187 रुपयांपर्यंत हे दर कमीच आहेत.

Ajay Patil
Published:

Soybean Market Price:- गेल्या वर्षीच्या हंगामातील जर आपण सोयाबीन बाजारभावाची स्थिती पाहिली तर ती खूपच निराशाजनक अशी राहिली आहे व यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून फटका सहन करावा लागलेला आहे. केंद्र सरकारचे जे काही अनेक प्रकारचे धोरणे आहेत त्याचा परिणाम या सगळ्या सोयाबीनच्या बाजारभावांवर होऊन गेल्या संपूर्ण हंगामामध्ये सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची पुरती निराशा केलेली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता यावर्षीचा सोयाबीनचा हंगाम सुरू होण्याचा कालावधी असून या येणाऱ्या कालावधीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव नेमके कसे असतील? यावर्षी तरी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळेल का? इत्यादी प्रश्न आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात गर्दी करू लागल्याची परिस्थिती आहे.

सध्या जर आपण केंद्र सरकारचा खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णयाच्या बाबतीत जर बघितले तर या निर्णयाचे काहीसे सकारात्मक परिणाम स्थानिक बाजारपेठेमध्ये दिसायला लागले असून सोयाबीनच्या सरासरी दरांमध्ये काहीशी सुधारणा झालेली असून हे दर 690 रुपयांनी वधारून 4705 रुपयांवर गेले आहेत. परंतु जर सरकारचा हमीभाव पाहिला तर त्या तुलनेत मात्र अजूनदेखील 187 रुपयांपर्यंत हे दर कमीच आहेत.

 सोयाबीनचे वाढलेले दर या हंगामात टिकतील का?

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला व यामुळे सोयाबीनच्या स्थानिक बाजारपेठेत सकारात्मक परिणाम दिसून आले. सोयाबीनचे दर हे प्रतिक्विंटल 690 रुपयांनी वाढून सरासरी 4705 रुपयांवर गेले. असे असले तरी हे वधारलेले दर हमीदराच्या तुलनेत अजून देखील 187 रुपयांनी कमीच आहे.

परंतु आता नवीन सोयाबीनचा हंगाम सुरू होत असून काही दिवसांनी बाजारपेठेमध्ये पुन्हा सोयाबीनची आवक वाढायला लागेल व आवक वाढल्यानंतर मात्र हे वाढलेले तर टिकतील का? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे यावर्षी जर आपण एकंदरीत सोयाबीनची लागवड क्षेत्र पाहिलं तर यामध्ये संपूर्ण राज्यात 51.52 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली असून विदर्भाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अमरावती विभागात 15.18 लाख आणि नागपूर विभागात 2.85 लाख असे एकूण 18.04 लाख क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली आहे.

परंतु नेमके विदर्भ व मराठवाडा तसेच जे राज्यातील प्रमुख सोयाबीन उत्पादक परिसर आहे त्या ठिकाणी झालेला सततचा पावसाने या ठिकाणाच्या सरासरी सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.

 खाद्यतेल आयातीवरील शुल्कात वाढ केल्यामुळे  स्थानिक बाजारपेठेत सकारात्मक परिणाम

जास्त पावसामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये घट येऊ शकते अशी शक्यता केंद्राने लक्षात घेतल्यामुळे अगोदरच सोयापेंड आयातिचा निर्णय घेण्यात आला होता व त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव चांगलेच घसरले होते व राज्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये चार हजार शंभर रुपये सरासरीचा दर मिळत होता.

परंतु आता राज्यात येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुका येत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली गेली व त्याचा बऱ्यापैकी सकारात्मक परिणाम राज्यातील बाजारपेठेमध्ये दिसून येत असून पश्चिम विदर्भातील बाजारांमध्ये या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी सोयाबीनचे दर 205 रुपयांनी वाढलेली दिसले.

मागच्या आठवड्यामध्ये सोयाबीनचे सरासरी तर प्रतिक्विंटल चार हजार पाचशे रुपयांवर गेले होते. या निर्णयानंतर जर आपण सोयाबीनच्या दरवाढीची स्थिती पाहिली तर अमरावती बाजार समितीत एका दिवसात 205 रुपयांची तर गेल्या महिन्याच्या तुलनेत 690 रुपयांची सरासरी वाढ सोयाबीन दरांमध्ये पाहायला मिळालेली आहे. परंतु आता ही स्थिती येणाऱ्या दिवसात कशी राहील किंवा हे दर टिकून राहतील का? हे मात्र येणाऱ्या काळातच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe