Aadhar Card Loan : आता मिळेल आधार कार्ड वरून 10 हजार रुपयाचे लोन ! वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ajay Patil
Published:

Aadhar Card Loan:- बरेच जण नोकरी किंवा व्यवसाय करत असतात. परंतु आर्थिक गरजा किंवा जास्त असल्यामुळे बचत ही फार कमी प्रमाणात असते. अशा प्रसंगी जर भविष्य काळामध्ये काही अचानक आरोग्य विषयक समस्या किंवा इतर काही आर्थिक समस्या उद्धवल्या तर पैशांची नितांत गरज भासते.

अशावेळी माणूस विविध वित्तीय संस्था किंवा मित्र, नातेवाईक यांच्याकडून पैशांची तजवीज करतात. यामध्ये जर तुम्हाला बँकेकडून पर्सनल लोन वगैरे घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला एका प्रोसेस मधून जावं लागतं तसेच अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते.

परंतु जर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून आधार कार्डच्या साह्याने ई मुद्रा अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही कुठल्याही बँकेच्या शाखेमध्ये जाऊन ते घेऊ शकतात. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही दहा हजार रुपयाचे कर्ज घेऊ शकतात व तुमची तातडीची आर्थिक निकड भागवू शकतात. या अनुषंगाने आधार कार्ड वरून कर्ज कसे मिळवायचे? याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.

आधार कार्ड वरून दहा हजार रुपयाच कर्ज कसे मिळवायचे?

पैशांची गरज ही कोणालाही भासते. अनेकदा वैयक्तिक गरजांकरिता किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपल्याला पैसा लागतो. परंतु याकरिता तुमचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर उत्तम असणे आवश्यक असते.

अशा मध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल व तुमचा सिबिल स्कोर उत्तम असेल तर तुम्ही सहजतेने आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात. आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया,

कोटक महिंद्रा बँक तसेच पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी बँक इत्यादी बँका तुम्हाला घरबसल्या आधार कार्डच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जाची सुविधा देतात. या माध्यमातून घेतलेल्या लोनला आधार कार्ड कर्ज असे देखील म्हणतात.

आधार कार्डवर कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती

1- यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

2- अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

3- 700 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असणे गरजेचे आहे.

4- अर्जदाराचे नियमित मासिक वेतन 12000 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

5- अर्जदार हा पगारदार म्हणजेच नोकरी करणारी व्यक्ती असणे गरजेचे आहे.

6- अर्जदाराकडे पॅन कार्ड तसेच आधार कार्ड व उत्पन्नाचा पुरावा यासारखी केवायसी कागदपत्रे असावीत.

7- महत्वाचे म्हणजे तुम्ही याआधी कुठल्याही बँकेकडून किंवा एखाद्या खाजगी वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतलेले नसावे.

आधार कार्डच्या माध्यमातून किती कर्ज मिळू शकते?

आधार कार्डच्या माध्यमातून कमीत कमी दहा हजार ते कमाल दोन लाख रुपये पर्यंतची कर्ज सुविधा मिळते. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.

आधीपासून तुमचे कुठलेही कर्ज सक्रिय नसावे. तुम्हाला जर पर्सनल लोन ताबडतोब घ्यायची असेल तर तुम्ही रिझर्व बँकेच्या एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांच्या कर्ज अर्जांची यादी पाहू शकतात व आधार कार्ड व क्रेडिट स्कोर च्या साह्याने पर्सनल लोन ऑनलाइन मिळवू शकतात.

ऑनलाइन पर्सनल लोन मिळवण्यासाठी चे काही महत्त्वपूर्ण ॲप

काही ऑनलाईन पद्धतीने कर्ज सुविधा पुरवणारे ॲप्लिकेशन देखील उपलब्ध असून या माध्यमातून देखील तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कर्ज सुविधा मिळवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने आयडीएफसी फर्स्ट बँक इन्स्टंट लोन,नावी, इन्स्टामनी, हिरो फिनकॉर्फ, बजाज फिनसर्व, पॉलिसी बाजार,किस्त, बडी लोन, अर्ली सॅलरी, निरा, क्रेडिट बी, एम पॉकेट, फ्री रिचार्ज, मनी व्ह्यू इत्यादी इन्स्टंट लोन एप्लीकेशन आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe