Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! एनपीसीआईएलमध्ये ‘या’ 325 रिक्त जागांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

NPCIL Latest Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एनपीसीआईएलमध्ये तब्बल ३२५ रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली आहे.

NPCIL Latest Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एनपीसीआईएलमध्ये तब्बल ३२५ रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीच्या माध्यमातून नेमकी कोणते रिक्त पदे भरली जाणार आहेत, किती पदे भरली जाणार आहेत, तसेच अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….

कोणत्या रिक्त पदांची होणार आहे भरती?

एनपीसीआईएलने काढलेल्या अधिसूचनेनुसार मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिलच्या कार्यकारी प्रशिक्षणार्थी या रिक्त पदासाठी ही भरती होणार आहे.

किती रिक्त पदांची होणार आहे भरती?

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेकॅनिकल : 123 पदे, केमिकल : 50 पदे, इलेक्ट्रिकल : 57 पदे, इलेक्ट्रॉनिक्स : 25 पदे, इन्स्ट्रुमेंटेशन : 25 पोस्ट, सिव्हिल : 45 पदे या पदासाठी भरती आयोजित झाली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

सदर अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, BTech पास आणि GATE – 2021/2022/2023 पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. मात्र शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे. 

हे पण वाचा :- मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा ‘या’ महिन्यात काढणार 4 हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात, पहा….

यासाठी अर्ज कसा करायचा?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार http://npcilcareers.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करू शकणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 28 एप्रिल 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; अखेर ‘या’ रेल्वे स्थानकांच्या नावात झाला बदल, पहा कोणती आहेत स्थानके आणि काय…