Okra Farming : भेंडीची लागवड करण्याचा बेत आहे का? मग ‘या’ जातीच्या भेंडीची लागवड करा, डिटेल्स वाचा

Okra Farming Marathi : शेतकरी बांधव अलीकडे कमी कालावधीत काढण्यासाठी तयार होणाऱ्या तरकारी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. यामध्ये भेंडी या पिकाचा देखील समावेश होतो. दरम्यान भेंडी हे पीक राज्यातील जवळपास सर्वच विभागात उत्पादित केले जात असलं तरी देखील खानदेशात या पिकाची लागवड सर्वाधिक होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेषता जळगाव जिल्ह्यात याची लागवड विशेष उल्लेखनीय असून काही भागात बारामाही या पिकाची शेती केली जाते. खरं पाहता भाजीपाला पिकांच्या यादीत भेंडीचे स्थान हे कायमच अव्वल राहिले आहे. भेंडीमध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता मानवी आरोग्यासाठी भेंडीचे सेवन फायदेशीर ठरत असल्याचे अनेक अहवाल प्रकाशित झाले आहेत.

शिवाय डॉक्टर देखील भेंडीच्या सेवनाचा सल्ला देतात. यामुळे बाजारात कायमच भेंडीची मागणी असते. दरम्यान कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. मात्र अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. उन्हाळी हंगामात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते मार्च महिन्यात लागवड केले जाते.

Advertisement

खरीप हंगामात जून ते ऑगस्ट दरम्यान भेंडीची लागवड ही केली जाऊ शकते. तसेच कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येत असल्याची माहिती तज्ञ लोकांनी दिली आहे. एकंदरीत काय भेंडीची लागवड बारामाही केली जाते. शिवाय बाजारात दर अधिक राहतो यामुळे हे एक फायदेशीर पीक ठरणार आहे.

निश्चितच बाजारात मागणी असल्याने भेंडीला समाधानकारक जर दर मिळाला तर याची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होते. परंतु कोणत्याही पिकाच्या शेतीतून दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित जातींची शेती करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण भेंडीच्या काही सुधारित जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भेंडीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

Advertisement

फुले उत्कर्ष :- महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादित केली जाणारी ही भेंडीची सुधारित जात आहे. ही जात 2003 मध्ये निवड पद्धतीने पुण्याच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातून प्रसारित करण्यात आली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीची फळे हिरव्या रंगाची, पाचधारी, कोवळी आणि आकर्षक असतात. शिवाय फळांची लांबी 8 ते 10 सें.मी.दरम्यान असते. या जातीच्या भेंडी पिकाची प्रथम तोडणी 48 ते 52 दिवसांत होत असते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तज्ञ लोकांनी या जातीपासून 230 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भेंडीची ही जात केवडा रोगास कमी बळी पडते.

अकोला बहार :- भेंडीची ही देखील जात महाराष्ट्रात उत्पादित होते. विशेषता विदर्भात या जातीची लागवड अधिक आहे. महाराष्ट्रातील हवामान या जातीला मानवत असल्याने या जातीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय बाजारात अनेक जाती उपलब्ध आहेत यामध्ये वर्षा उपहार, पुसा सावनी, परभणी क्रांती, अर्का अनामिका अशा इतर जाती प्रमुख आहेत.

लाल भेंडीची पण लागवड करता येणार 

Advertisement

याशिवाय शेतकरी बांधव लाल भेंडीची देखील शेती करू शकतात. लाल भेंडी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परदेशामध्ये लाल भेंडीची लागवड पूर्वीपासून असली तरी आपल्याकडे अद्याप फारसा प्रसार झालेला नाही. अलीकडे पंचतारांकित हॉटेल, मॉल, शहरी भागात याची मागणी वाढत आहे. त्यामुळे याची देखील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

दरम्यान हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाल भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट, लोह, कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. शिवाय चंवीला ही भेंडी उत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. शिवाय अधिक वजन असल्याने उत्पादन जास्त मिळते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हिरव्या भेंडीच्या तुलनेत अधिक दर मिळतो.

जर आपण याच्या सुधारित जातीचा तर विचार केला तर भारतात केवळ एकच लाल भेंडीची जात आहे जी की भारतीय भाजीपाला संशोधन संस्था, वाराणसी येथे विकसित झाली आहे. काशी लालिमा अशा या जातीचे नाव असून 2019 मध्ये ही जात लागवडीसाठी भारतात प्रसारित झाली आहे. लाल भेंडीच्या या जातीपासून हेक्टरी १४-१५ टन उत्पादन सहजरित्या मिळवलं जाऊ शकतं. निश्चितच लाल भेंडीची शेती देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. 

Advertisement