जुनी पेन्शन योजनेबाबत मोठं अपडेट ! केंद्रीय वित्त राज्यमंत्री यांनी लोकसभेत दिली ‘ही’ माहिती

Old Pension Scheme News : सध्या संपूर्ण भारत वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू केली जावी ही मागणी जोर धरत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील यावरून रान पेटल आहे. महाराष्ट्रातील हजारो राज्य कर्मचारी ओपीएस योजना लागू केली जावी यासाठी सरकारवर दबाव बनवत आहेत.

मी आपणास सांगू इच्छितो की 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. एनपीएस योजनेत मोठ्या प्रमाणात दोष असल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार ओपीय योजना लागू केले जावे यासाठी मागणी होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान आता याबाबत एक महत्त्वाच अपडेट समोर आल आहे. खरं पाहता लोकसभेमध्ये ओ पी एस योजना लागू करण्यासंदर्भात असुद्दीन ओवेसी यांनी एक अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला लोकसभेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी उत्तर दिलं.

खरं पाहता पंजाब सरकारने नुकतीच आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. साहजिक या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा एनपीएस मध्ये संचित कॉर्पस निधी जमा झाला आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना हा निधी परत देण्याबाबत एक प्रस्ताव शासनाकडे आला आहे.

यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा एनपीएस मध्ये जमा झालेला निधी टप्प्याटप्प्याने देऊ केला जाणार आहे. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील ओपीएस योजना लागू करणेबाबत प्रश्न लोकसभेत उपस्थित केला असतां भागवत कराड यांनी सांगितले की, या संदर्भातील प्रस्ताव पीएफआरडीए विभागाला देण्यात आला आहे.

निश्चितच ओ पी एस योजनेसाठी शासन दरबारी चर्चेचा सत्र सुरू झाल आहे. दरम्यान, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब सारख्या राज्यांनी आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस योजना बहाल केली असल्याने महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणी आता तीव्र होऊ लागली आहे.