सध्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून शेअर बाजारात चांगला अभ्यास करून आणि तज्ञांच्या मार्गदर्शन घेऊन जर गुंतवणूक केली तर गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे. सध्या जर आपण शेअर मार्केटचा विचार केला तर सध्या बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
आज 29 मे रोजी शेअर बाजारात 200 पेक्षा अधिक अंकांनी घसरण पाहायला मिळाली व त्यानंतर सेन्सेक्स 74800 च्या पातळीवर व्यवहार करत आहे व त्याच वेळी निफ्टी ही 100 पेक्षा अधिक अंकांनी घसरलेला असून 22 हजार 750 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. साधारणपणे सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात ही घसरण पाहायला मिळाली आहे.
परंतु तरीसुद्धा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीचे शेअर्स मात्र मंगळवारी देखील गुंतवणूकदारांच्या फोकस मध्ये राहिल्याचे चित्र होते. यामध्ये जर आपण पाहिले तर देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंदराठी यांनी या शेअर्स बाबत पॉझिटिव्हिटी दाखवली असून त्यावर त्यांनी बाय रेटिंग देखील दिली आहे. या शेअर्स बद्दल आनंद राठी यांनी मत व्यक्त केले की एका महिन्यामध्ये हा शेअर 12 टक्क्यांपर्यंत वाढेल. काल या कंपनीचे शेअर्स इंट्राडे 1787.95 रुपयांवर व्यवहार करत होते.
तज्ञांनी या शेअर साठी दिलेली टार्गेट प्राईज काय आहे?
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांच्या मते 1600 ते 1700 च्या अंदाजे रेंजमध्ये कंसॉलिडेशन कालावधीनंतर या शेअरची किंमत तीन ते चार महिने राहिलेल्या मंदीच्या ट्रेंड मधून यशस्वीपणे बाहेर पडली
असून याकरिता ब्रोकरेज फर्मच्या माध्यमातून सुचवण्यात आले आहे की, 1785 ते 1815 च्या श्रेणीतील लॉंग पोझिशन्स घेण्याचा विचार यासाठी करावा व त्याकरिता टारगेट प्राईज 2020 रुपये निश्चित करण्यात आली आहे व स्टॉप लॉस 1690 रुपये ठेवण्यात आला आहे.
काय आहे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचा व्यवसाय?
ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी असून हैदराबाद शहरांमध्ये या कंपनीचे उत्पादन कारखाने आहेत. कंपनी सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक बस तयार करते व आता ही कंपनी इलेक्ट्रिक ट्रक आणि इलेक्ट्रिक टिप्पर साठी ई मोबिलिटी विभागामध्ये आपली उत्पादन श्रेणी वाढवणार असल्याचे देखील समोर आले आहे.
आपण या कंपनीची मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत कामगिरी पाहिली तर कंपनीला 13.71 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला असून तो मागील वर्षाच्या कालावधीतील 27.01 कोटीवरून मात्र लक्षणीय घसरला आहे. कंपनीचा महसूल वार्षिक 375.91 कोटी रुपयावरून मार्च तिमाही मध्ये 288.81 कोटींवर घसरला.