कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Price Will Increase : महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

याव्यतिरिक्त खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातही कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही विभागात कमी-अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

कारण की, कांद्याला अपेक्षित असा बाजारभाव बाजारात मिळत नाहीये. यामुळे अजूनही दरवाढीची शेतकऱ्यांना आशा आहे. खरंतर खरीप हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांनी अतिशय कवडीमोल दरात विकला आहे.

आता रब्बी हंगामातील म्हणजेच उन्हाळी कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येत असून उन्हाळी कांद्याला देखील अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. 

हे पण वाचा :- यंदा उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होणार का? काय राहणार भविष्यातली परिस्थिती, वाचा…

अशातच मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. ती म्हणजे भारत-बांगलादेश सीमा खुली झाली आहे. रविवारपासून अर्थातच काल चार जून 2023 पासून ही सीमा खुली झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा बांगलादेशला निर्यात करणे सोपे होणार आहे.

यामुळे कांदा दरात जवळपास 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतची वाढ होईल अशी आशा व्यापाऱ्यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे. निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मार्च 2023 पासून भारत-बांगलादेश सीमा बंद होती.

परिणामी महाराष्ट्रातून विशेषतः नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशला पाठवला जाणारा कांदा निर्यात करण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

निर्यात करताना अडचणी येत असल्याने राज्यातून बांगलादेशला कांदा निर्यात कमी होत होती. परिणामी देशांतर्गत कांदा साठा वाढला होता आणि याचा फटका म्हणून कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली होती. 

हे पण वाचा :- सावधान ! अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात आज गारपीटीची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान? पहा IMD चा अंदाज

मात्र आता ही सीमारेषा खुली झाली असल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्यासाठी पूरक परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे कांदा दरात जवळपास 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची वाढ होऊ शकते असं मत व्यक्त होत आहे.

याबाबत कांदा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाले असल्याने तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांगलादेश सरकारने मार्च 2023 पासून कांद्याची आयात बंद केली होती.

यामुळे नाशिक जिल्ह्याचा कांदा बांगलादेशला पाठवणे बंद झाले आणि याचा फटका देशांतर्गत सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र आता बांगलादेशमध्ये कांदा कमी शिल्लक राहिला असून तेथे कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

परिणामी बांगलादेश सरकारने आता कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिली असून काल अर्थातच चार जून 2023 पासून भारत-बांगलादेश सीमा खुली झाली आहे. यामुळे आता कांदा दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! तुरीचे दर 11000 वर पोहोचतात केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, दरात घसरण होण्याची दाट शक्यता