Organic Business Idea: ‘हे’ 3 ऑरगॅनिक व्यवसाय देतील तुम्हाला भरघोस आर्थिक उत्पन्न, प्रचंड प्रमाणात मिळेल नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Organic Business Idea:- रासायनिक खतांचा दीर्घकाळ आणि भरमसाठ वापर तसेच पिकांवर वापरात येत असलेल्या कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे जमिनीची गुणवत्ता तर खालवलेली आहे परंतु माणसाच्या शरीराला आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील नुकसान होत आहे.

त्यामुळे आता नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले धान्य उत्पादने तसेच फळे व भाज्या एवढेच नाही तर नैसर्गिक चाऱ्यावर आणि आहारांवर जनावरांचे व्यवस्थापन आणि त्या माध्यमातून मिळालेले दूध व त्यापासून बनवलेले दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर न करता निर्माण झालेली ऑरगॅनिक उत्पादने यांची मागणी वाढू लागली आहे.

त्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळामध्ये ऑरगॅनिक व्यवसाय सुरू केला तर यामध्ये चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. ऑरगॅनिक फूड म्हणजे कुठल्याही प्रकारचे कृत्रिम रसायनिक किंवा कीटकनाशके, कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर न करता पिकवलेली अन्नधान्य होय. या पार्श्वभूमीवर आपण तीन प्रकारचे ऑरगॅनिक व्यवसाय जे चांगला पैसा देऊ शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत.

 हे तीन ऑरगॅनिक व्यवसाय देखील प्रचंड नफा

1- ऑरगॅनिक डेअरी उत्पादने शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी डेअरी व्यवसाय करतात. शेतकऱ्यांना हा व्यवसाय करणे अधिक सोपे जाते कारण जनावरांना लागणारा चाऱ्याची उपलब्धता ही स्वतःच्या शेतातून देखील. परंतु यामध्ये जर ऑरगॅनिक डेअरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी जनावरांना नैसर्गिक खाद्य देणे गरजेचे आहे.

त्यामध्ये रासायनिक खते किंवा कीड तसेच कीटकनाशकांचा वापर न करता वाढवलेला चारा किंवा वाढवलेली कुरणे, गायराने येथील चाऱ्यावर गुरांचे पालन पोषण यामध्ये अभिप्रेत असते. ऑरगॅनिक डेअरी व्यवसायामध्ये जनावरांनी जास्त दूध द्यावे याकरिता कृत्रिम औषधांचा किंवा अँटीबायोटिक्स आणि हार्मोनचा वापर देखील टाळणे गरजेचे आहे.एवढेच नाही तर जनावरांचे ब्रीडिंग करताना कृत्रिम ब्रीडिंग केली जाऊ नये असे यामध्ये अभिप्रेत आहे.

सेंद्रिय शेती करणे ज्या शेतकऱ्याचे ध्येय आहे त्यांना हा ऑर्गानिक डेअरी उत्पादनांचा व्यवसाय चांगली कमाई करून देऊ शकतो. दुधात कुठल्याही प्रकारची भेसळ नको अशा प्रकारची अपेक्षा ग्राहकांची असते. दुधामध्ये कुठल्याही प्रकारचा कीटकनाशकांचा अंश नसावा प्रदूषके नसावी यासाठी ग्राहक आग्रही आहेत. त्यामुळे ऑरगॅनिक डेअरी व्यवसायाला भविष्यकाळात चांगली संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

2- ऑरगॅनिक मत्स्यशेती आरोग्यपूर्ण आणि रोगमुक्त मासे ग्राहकांना मिळणे हा देखील एक महत्त्वाचे असून ऑरगॅनिक फिश फार्मिंगचा हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजेच ऑरगॅनिक फिश फार्मिंग मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रतिजैविक, हार्मोनचा वापर न करता केलेले मत्स्यपालन होय. ज्या ठिकाणी मासे पाळले जात आहे त्या ठिकाणचे वातावरण देखील पूर्णपणे नैसर्गिक ठेवणे महत्त्वाचे ठरते. तसेच ऑरगॅनिक फिश फार्मिंग मध्ये मासे पालन करताना माशांना दिले जाणारे खाद्य सुद्धा रसायनमुक्त असणे गरजेचे आहे.

याकरिता वाइल्ड फिश पासून बनवलेले फिश मिल याकरता वापरता येते. साधारणपणे मत्स्यपालन ओपन नेट पद्धतीने करतात. परंतु ऑरगॅनिक फिश फार्मिंग मध्ये ओपन नेट पद्धतीचा वापर करू नये. यामध्ये समुद्रात किंवा जलाशयात अंतरा अंतरावर जाळ्या किंवा पिंजरे बांधले जातात.परंतु यामध्ये पिंजरे गंजण्यांचा धोका असतो तसेच पाण्यात सांडपाणी व कारखान्यातील विषारी रसायने, टाकाऊ पदार्थ मिसळून पाणी प्रदूषित होण्याचा धोका देखील असतो.

मच्छी शेती जशी खाऱ्या पाण्यात करता येते तशी ती गोड्या पाण्यात देखील करता येते. ऑरगॅनिक फिश फार्मिंग व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टी टाळून मत्स्य शेती करणे अभिप्रेत आहे. या व्यवसायाला देखील भविष्यकाळात खूप चांगल्या पद्धतीने मागणी येण्याची शक्यता आहे.

3- ऑरगॅनिक भाज्या, बियाणे विक्री व्यवसाय सध्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचे वारे वाहत असल्यामुळे अनेक लोकांना ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेली भाज्या व फळे खाण्याची इच्छा असते. परंतु या पद्धतीने जर बियाणे किंवा भाज्यांचे उत्पादन घ्यायचे असेल तर ते कुठून आणावे हे देखील आपल्याला माहीत नसते.

त्यामुळे या व्यवसायाच्या मदतीने तुम्ही इतरांना मदत करू शकतात. ऑरगॅनिक बियाणे विक्री हा त्याचा महत्त्वपूर्ण मार्ग असून यामध्ये फारसी गुंतवणूक करावी लागत नाही. त्यामध्ये चांगला दर हवा असेल तर आयात केलेले बियाणे विक्रीसाठी ठेवावीत. परंतु बियाणे जर तुम्हाला आयात करायचे असतील तर ते स्थानिक कृषी विभागाकडून त्यासंबंधीच्या आयात व निर्यात नियम जाणून घेणे गरजेचे आहे.

कारण बियाणे आयात करण्यावर अनेक देशात बंदी आहे. या बंदी मागे देशातील इकोसिस्टीम चे संरक्षण व्हावे हा हेतू असतो. त्यामुळे ऑरगॅनिक भाजीपाला विक्री किंवा बियाणे विक्री हा व्यवसाय देखील फायद्याचा ठरू शकतो.