Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; धानाच्या ‘या’ नवीन जाती ठरतील फायदेशीर, मिळणार अधिक उत्पादन

Paddy Farming : देशभरात सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची कामे, हार्वेस्टिंग ची कामे सुरू आहेत. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांची सध्या स्थितीला सोंगणी केली जात आहे.

Paddy Farming : देशभरात सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची कामे, हार्वेस्टिंग ची कामे सुरू आहेत. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांची सध्या स्थितीला सोंगणी केली जात आहे. या व्यतिरिक्त राज्यातील शेतकरी बांधव उन्हाळी हंगामातील कांदा काढण्यासाठी देखील आगामी काही दिवसात सुरुवात करणार आहेत. या ठिकाणी उन्हाळी हंगामातील कांदा काढला जात आहे. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांनी गव्हाची हार्वेस्टिंग पूर्ण केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ज्या शेतकऱ्यांनी वेळेत गव्हाची पेरणी केली होती त्यांचा गहू काढणी झाला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उशिरा गव्हाची पेरणी केली होती अशा शेतकऱ्यांचा गहू सध्या स्थितीला काढला जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने तसेच काही हवामान तज्ञांनी एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हे पण वाचा :- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज रात्रीपासून ‘हा’ महत्त्वाचा मार्ग राहणार ‘इतके’ दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणता? पहा….

निश्चितच ही शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत खरीप हंगामाला देखील सुरुवात होणार आहे. साधारणता मान्सूनच आगमन झालं की खरीप हंगामातील पिक पेरणीसाठी शेतकरी प्रयत्न करणार आहेत. म्हणजेच आणखी दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकरी खरीप हंगामाकडे वळणार आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण खरीप हंगामातील मुख्य पीक धान पिकाच्या काही सुधारित जाती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जरी धान पिकाच्या रोवणीसाठी अजून अवकाशा असला तरी याच्या सुधारित जाती शेतकऱ्यांसाठी जाणून घेणे अति महत्त्वाचे आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया धानाच्या सुधारित जाती.

हे पण वाचा :- पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, NHI ने थेट तारीखच सांगितली

दंतेश्वरी भात :- धान पिकाची आपल्या राज्यात प्रामुख्याने विदर्भात अधिक रोवणी केली जाते. याशिवाय कोकणातही भात लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील मिनी कोकण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कळवण व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भात लावला जातो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यात वेगवेगळ्या सुधारित धानाच्या जातींची रोवणी होत असते. दरम्यान दंतेश्वरी ही देखील धानाची एक सुधारित जात आहे. हा वाण रोवणी केल्यानंतर ९० ते ९५ दिवसांत काढण्यासाठी तयार होतो  तयार होते. जाणकार लोक सांगतात की या जातीपासून 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. ही एक लहान आणि मध्यम आकाराची वनस्पती आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात त्याचे उत्पादन चांगले मिळते.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1, NA करण्याची नामी संधी; खर्च लागणार मात्र ‘इतका’, पहा अर्ज करण्याची पद्धत

पुसा 1460 :- ही देखील धानाची एक सुधारित जात आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यापासून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. रोवणी केल्यानंतर साधारणतः 125 दिवसांनी यापासून उत्पादन मिळते. हेक्टरी 55 क्विंटलपर्यंत उत्पादन हा वान देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. 

पुसा सुगंध ३ :- पुसा सुगंधा 3 ही देखील भाताची एक सुधारित जात आहे. हा सुगंधी भाताचा वाण आहे. याला बाजारात चांगली मागणी देखील असते. याच्या भाताचा वास, सुगंध इतर जातींच्या तुलनेत काहीसा वेगळा असतो. ही जात रोवणी केल्यानंतर 120 ते 125 दिवसांत तयार होते. यापासून प्रति हेक्‍टरी ४०-४५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञ लोकांनी केला आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! 8 वी पास तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची संधी; जाहिरात पहा अन आजच अर्ज करा