Pan Card Update:- आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही महत्वाचे कागदपत्रे असून यातील आधार कार्डचा विचार केला तर हे प्रत्येक शासकीय कामांसाठी अत्यावश्यक करण्यात आलेले असून तुमचे रेशन कार्ड असो किंवा मतदान कार्ड किंवा बँक खाते याच्याशी आधार लिंक करणे आता अनिवार्य आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे या सोबतच पॅन कार्ड देखील एक महत्त्वाची कागदपत्र असून तुम्हाला बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहारांकरिता पॅन कार्ड हे अत्यावश्यक असते. कारण व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही कागदपत्रे असणे खूप गरजेचे आहे. परंतु कधी कधी नजर चुकीने किंवा काही कारणास्तव पॅन कार्ड आपल्याकडून हरवते.
त्यामुळे जर एखाद्या कामाला तुम्हाला पॅन कार्ड लागले तर मात्र खूप मोठी धावपळ होण्याची शक्यता असते. अति महत्त्वाचे काम देखील तुमचे पॅन कार्ड नसल्यामुळे अडकून राहू शकते. जर तुमचे देखील पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्हाला आता टेन्शन घेण्याची गरज नाही.
कारण आता तुम्ही डिजिटल पद्धतीचे जे काही पॅन कार्ड आहे त्याचा वापर करू शकता व तुम्ही त्याला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून त्या ठिकाणी ते दाखवून तुमचे काम पूर्ण करू शकतात. या पॅन कार्डला ई-पॅन असं देखील म्हटले जाते. हे पॅन कार्डचे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन असून ते तुम्हाला डाऊनलोड करायचे असते व याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यामुळे या लेखांमध्ये आपण असे पॅन कार्ड कशा पद्धतीने डाऊनलोड करावे हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊ.
अशा पद्धतीने डाऊनलोड करा तुमचे ई–पॅन कार्ड
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला अधिकृत आयकर ई फायलिंग संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
2- या वेबसाईटवर गेल्यानंतर ती जेव्हा ओपन होते तेव्हा डाव्या बाजूला तुम्हाला इन्स्टंट ई–पॅन(Instant E-PAN) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3- त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या चेक स्टेटस/ डाउनलोड पॅन च्या खाली दिलेल्या कंटिन्यू वर क्लिक करणे गरजेचे आहे.
4- त्यानंतर तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या चेक बॉक्स वर मार्किंग करावी आणि नंतर कंटिन्यू वर क्लिक करावे.
5- त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो काही मोबाईल नंबर लिंक असतो त्यावर एक ओटीपी येतो.
6- त्यानंतर ओटीपी टाकावा आणि कंटिन्यू वर क्लिक करा.
7- त्यानंतर दुसरी स्क्रीन दिसेल व यामध्ये व्ह्यू ई–पॅन आणि डाउनलोड ई–पॅन चा पर्याय निवडावा.
8- नंतर सेव्ह द पीडीएफ फाईलवर क्लिक करावे.त्यानंतर तुमचे ई-पॅन डाउनलोड होते.
9- समजा एखाद्या वेळेस जर तुम्हाला ई पॅन डाउनलोडचा पर्याय दिसत नसेल तर मागे जाऊन गेट न्यू ई–पॅन चा पर्याय निवडणे गरजेचे आहे. त्यानंतर दिलेली संपूर्ण प्रोसेस फॉलो करावी लागेल.
10- तुम्ही जी काही फाईल डाऊनलोड कराल ती जर पासवर्डने संरक्षित असेल तर त्याचा पासवर्ड म्हणून तुम्ही तुमची जन्मतारीख DDMMYY या फॉरमॅटमध्ये टाकणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहजरीत्या पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात व मोबाईल मध्ये सेव्ह करून त्याचा वापर तुम्हाला आवश्यक असलेल्या ठिकाणी करता येतो.