Pancard club ltd money refund 2022 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत पैसे अडकलेत ? हा अर्ज भरा ! पैसे मिळतील परत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pancard club ltd money refund 2022 : पॅन कार्ड क्लब लिमिटेड  कंपनीच्या (Pancard Club Limited Company) गुंतवणूकदारांसाठी (Investor) एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपण ठाऊकच आहे पॅनकार्ड क्लब लिमिटेड (Pancard Club Ltd) या कंपनीच्या 51 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. यामुळे या कंपनीच्या विरोधात सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नासिक, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या अनुषंगाने गृहराज्यमंत्री देसाई यांनी या कंपनीचा गुंतवणूकदारांना नियमानुसार तातडीने परतावा दिला जावा, संबंधित प्राधिकरणाने या कंपनीच्या लिलावासंदर्भात आवश्यक ती प्रक्रिया लवकरात लवकर अमलात आणावी असे आदेश दिले होते. या कंपनीच्या संदर्भात एका मंत्रालयीन बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीदरम्यान मंत्रीमहोदयांनी गुन्हे शाखेला सूचना देखील दिल्या होत्या. तसेच कंपनीच्या गुंतवणूकदारांना न्यायालयाच्या निर्णयानंतर (Court Decision) तातडीने परतावा देण्यासाठी प्रक्रिया, मालमत्ता लिलावाची प्रक्रिया अमलात आणली जावी तसेच त्या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे निर्देश देसाई यांनी 25 नोव्हेंबर 2021 रोजी दिले होते. आता या संदर्भात एक महत्त्वाच अपडेट हाती आले असून या कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना परतावा देण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष न्यायालयाकडून सुरू करण्यात आली असून या संदर्भात नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण कोर्टाने गुंतवणूकदारांना परतावा मिळावा यासाठी निराकरण प्रक्रियाची नेमणूक केली आहे. आता पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या सभासदांना परतावा मिळावा यासाठी आवश्यक प्रोसेस करण्यास सांगितले गेले आहे.

यामुळे आज आपण कंपनीच्या गुंतवणूकदारांना परतावा मिळविण्यासाठी नेमकी कशी प्रोसेस करावी लागेल याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. पॅन कार्ड क्लब च्या सर्व सभासदांनी गुंतवणूक व आपली केवायसी कागदपत्रे जमा करून खालील प्रमाणे प्रोसेस करावी.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड.

पॅनकार्ड.

कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक.

पॉलिसी मॅच्युरीटी डेट पासून 6 महिन्याचे बँक

स्टेटमेंट्स. मेंम्बरशीप सर्टिफिकेटस (Membership

Certificates) 

ACK रीसीट/मेंम्बरशीप पावती(Acknowledgement of receipt).

पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांना आपला परतावा मिळविण्यासाठी http://pclcirp.dcirrus.co या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. पोर्टलला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि कॅप्टचा कोड भरावा लागणार आहे. यानंतर Next बटनावर क्लिक करून मोबाईल वर आलेला ओटीपी भरावा लागणार आहे. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर एक अर्ज गुंतवणूकदारांना भरावा लागणार आहे. हा अर्ज परतावा मिळविण्यासाठी क्लेम अर्ज राहणार आहे.

या अर्जात किंवा ऑनलाईन क्लेम फॉर्ममध्ये सर्वप्रथम ओळख पुरावा निवडावा लागणार आहे. यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट वोटिंग कार्ड त्यापैकी एक निवडावे लागणार आहे. नंतर जो ओळख पुरावा निवडला असेल त्याचा क्रमांक नमूद करावा लागणार. ओळखीचा पुरावा अपलोड करावा लागेल. हा पुरावा pdf, jpg, jpeg,png या फाईलमध्ये असणे आवश्यक राहणार आहे. यासोबतच गुंतवणूकदारांना प्रिन्सिपल रक्कम, एकूण क्लेम रक्कम, पॉलिसी केव्हा संपणार आहे त्याची दिनांक, सरेंडर मूल्य या गोष्टी दिलेल्या रकान्यात प्रविष्ट कराव्या लागणार आहेत.

मित्रांनो एका गोष्टीची काळजी घ्या, ती म्हणजे नवीन क्लेम अर्ज करताना Folio Number या पर्यायात जो की मेंबरशिप सर्टिफिकेट वरती असतो तो फोलिओ नंबर टाकायचा आहे.

यानंतर, Form CA भरायचा आहे. यामध्ये दावा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता व्यवस्थितरित्या प्रविष्ट करा.

यांनतर Relevant Particulars हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये काही रकाने आधीच भरलेले असतील. जे रकाने खाली आहेत त्यामध्ये कर्ज सादर केले जाऊ शकते अशा तपशिलांचा उल्लेख नमुद करायचा आहे. debt केव्हा लागले आणि कसे लागले हे देखील या ठिकाणी नमूद करायचे आहे.

यानंतर क्लेम (Claim) फॉर्म गुंतवणूकदारांना भरावा लागेल. यामध्ये दाव्याच्या विरुद्ध परस्पर देय असेल तर ते नमूद करा. सुरक्षा ठेवलेली असल्यास सुरक्षा नमूद करा. बँका खात्याचा सविस्तर तपशील भरा. तसेच या दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. त्यानंतर ड्रॉपडाऊन मधन कोणतीही अधिकृत व्यक्ती निवडावी लागणार आहे.

यानंतर नाव रिलेशन पत्ता नमूद करा. तुम्ही स्वतः भरत असाल तर रिलेशन सेल्फ नमूद करा. इतर देखिल रिलेशन नमूद केले जाऊ शकते.

यानंतर फॉर्मची प्रिंट आउट घ्या. प्रिंट आउट घेतल्यानंतर घोषणापत्र भरा. घोषणापत्र भरल्यानंतर स्वाक्षरी करा. पडताळणी मध्ये, फॉर्मची प्रिंट आउट घेतल्यानंतर दावा दाखल करण्याचे ठिकाण आणि तारीख नमूद करा. आता पुन्हा एकदा साइन इन करा. फॉर्मवर स्वाक्षरी झाल्यानंतर फॉर्म स्कॅन करुन अपलोड करा. यानंतर स्वाक्षरी केलेला फॉर्म, बँक स्टेटमेंट. सदस्यता प्रमाणपत्र अपलोड करा. स्वा स्वारस्य पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे असल्यास अपलोड करा. यानंतर अपलोड अँड सबमिट क्लेम (Upload And Submit Claim) यावर क्लिक करा. आता तुमचा दावा सबमिट केला जाईल. यानंतर तुम्हाला एक ईमेल येईल ज्यामध्ये तुम्ही दावा सक्सेसफुली सबमिट केला आहे असे नमूद असेल आणि दावा क्रमांक देखील मिळणार आहे.

जाहीर घोषणा बघायची मग इथं क्लिक करा

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई, खंडपीठ, न्यायालय ऑर्डर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.