पंजाब डख मान्सून अंदाज : अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, बीडसह ‘या’ जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत पडला नाही असा मुसळधार पाऊस पडणार !

Ajay Patil
Published:
Panjab Dakh News 2023

Panjab Dakh News 2023 : राज्यातील शेतकरी बांधव तसेच सामान्य जनता गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच विविध हवामान तज्ञांच्या माध्यमातून मान्सून संदर्भात वेगवेगळी माहिती दिली जात आहे.

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी नुकतीच भारतीय मानसून संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. यानुसार राज्यात 10 जून ते 12 जून दरम्यान मान्सून आगमनाची शक्यता आहे. तसेच मान्सून केरळमध्ये पोहोचल्यानंतर त्या पुढील चार दिवस जर चांगला पाऊस झाला तर मान्सूनची पुढील प्रगती चांगली राहील अस देखील त्यांनी यावेळी नमूद केल आहे.

डॉक्टर साबळे यांनी मात्र यंदा पाऊसमान नेहमीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा विदर्भात मात्र शंभर टक्के पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राज्यातील इतर भागात मात्र जून आणि जुलै महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता राहणार आहे.

डॉक्टर साबळे यांच्याप्रमाणेच शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय व्यक्तिमत्व अर्थातच पंजाब डख यांनी देखील मान्सून संदर्भात तीन जूनला अर्थातच काल एक मोठी माहिती दिली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सूनचे आगमन येत्या काही दिवसात होणार आहे.

राज्यात मान्सूनला सात जून 2023 रोजी सुरुवात होणार असल्याचा अंदाज त्यांनी बांधला आहे. तसेच राज्यातील बहुतांशी भागात तीन जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे. तीन जून पासून ते 10 जून पर्यंत राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे.

खरतर 10 जून पर्यंत राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे. निश्चितच, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मात्र सहा जून पर्यंत जो पाऊस पडेल तो पूर्वमोसमी पाऊस राहणार आहे. 6 जून नंतर पडणारा पाऊस मात्र मोसमी पाऊस राहील, असं त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं आहे.

मान्सून कसा राहणार?

डख सांगतात की, यंदा चांगला जोरदार मान्सूनची शक्यता आहे. मान्सून 2023 हा पूर्वेकडून येणार असल्याने चांगला पाऊस होणार आहे. 8 जुनला मान्सून सुरु होईल, 17-18 जूनला मान्सूनची तीव्रता वाढेल म्हणजेच पावसाचा जोर वाढेल आणि 22 ते 23 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात सर्व दूर पसरणार आहे. विशेष म्हणजे जुन अखेर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होणार आहेत.

अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, पैठण, तसेच सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापूर, बार्शी, बीड, पुणे या जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत जेवढे मान्सून झालेत तेवढ्यात पडला नसेल असा पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

एकंदरीत आता लवकरच मान्सूनला सुरुवात होणार असून तत्पूर्वी पूर्व मोसमी पाऊस सुरू होणार आहे. तीन जून पासून पावसाला सुरुवात होईल आणि दहा जून पर्यंत राज्यात रोजाना भाग बदलत पाऊस पडणार आहे. 10 जून नंतरही राज्यात पाऊस सुरूच राहणार असून जुन अखेरपर्यंत पेरणी योग्य पाऊस पडण्याची शक्यता त्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe