Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….

Panjab Dakh Weather Update : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. वास्तविक या चालू एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.

Panjab Dakh Weather Update : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. वास्तविक या चालू एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

डखं यांनी एक एप्रिल रोजी या चालू महिन्यातील पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस आणि गारपीट झाली आहे. दरम्यान आता डक यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात 21 एप्रिल पासून पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….

21 एप्रिल म्हणजेच शुक्रवारपासून ते 28 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पडणारा पाऊस मात्र सर्व दूर राहणार नाही तर फक्त पाच ते सात जिल्ह्यात पडेल असा अंदाज आहे.

त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजात डखं यांनी पुढील महिन्यात अर्थातच मे महिन्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे. मे महिन्यात पाच मे आणि सहा मे रोजी पाऊस पडणार आहे. यानंतर राज्यात पावसाची उघडीप राहील.

हे पण वाचा :- अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी

मात्र 15 मे ते 16 मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होईल आणि पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केल आहे. याशिवाय, आज भारतीय हवामान विभागाने देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.

यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना सजग आणि सतर्क रहावे लागणार आहे. तसेच राज्यात उष्णतेची देखील लाट येण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होणार असून राज्यातील बहुतांशी भागात उकाडा देखील जाणवणार आहे. एकंदरीत राज्यात सध्या मिश्र हवामानाची अनुभूती होत आहे. 

हे पण वाचा :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात शिंदे-फडणवीस जमा करणार 2 हजार, ‘या’ आहेत योजनेच्या अटी, पहा…..