Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ‘इतके’ दिवस पडणार पाऊस, उर्वरित महाराष्ट्रात कस राहणार हवामान? पंजाबराव डख यांचा अंदाज काय म्हणतोय?, पहा….

Panjabrao Dakh Ahmednagar District Havaman Andaj April Month : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Panjabrao Dakh Ahmednagar District Havaman Andaj April Month : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आपल्या हवामान अंदाजाची संपूर्ण राज्याला भुरळ घालणाऱ्या पंजाबराव डख यांनी जिल्ह्यातील हवामानाबाबत एक मोठी माहिती सार्वजनिक केली आहे. खरं पाहता पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तंतोतंत खरा ठरत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा हवामान अंदाज समजण्यासाठी सोपा आणि खरा ठरत असल्याने याचा त्यांना शेती करताना फायदा होत आहे. हवामानाचा अंदाज समजून घेऊन त्यांना शेती व्यवसाय अधिक सोयीने करता येत असून आता त्यांना शेतीमधून चांगली कमाई यामुळे होत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो चिंता नसावी; ‘या’ 6 कारणामुळे कापूस दर वाढणार; तज्ञांचा अंदाज, पण…..

दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या निघोज येथे रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला हजर होते. 31 मार्च 2023 अर्थातच शुक्रवारी त्यांनी निघोज येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील एप्रिल महिन्याच्या हवामानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिल ते 8 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यासह या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे. यामुळे 5 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी शेतीमधील सर्व कामे करून घ्यावीत. हार्वेस्टिंग केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.

हे पण वाचा :- महिलांना सरकार देते 6,000 रुपये; थेट बँक खात्यात जमा होते रक्कम, पिंपरी चिंचवड मधील तब्बल 57 हजार महिलांनी घेतला लाभ, तुम्ही आहात का पात्र? पहा….

तसेच पशुधन देखील सुरक्षित ठिकाणी ठेवावे. आठ एप्रिल नंतर मात्र राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. परंतु 15 एप्रिल नंतर आणखी हवामानात बदल होणार असून अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचे डख यांनी वर्तवले आहे.

16 एप्रिल, 17 एप्रिल आणि 18 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. निश्चितच एप्रिल महिन्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना अधिक सजग राहून शेतीची कामे करावी लागणार आहेत.

हे पण वाचा :- मराठमोळ्या शेतकऱ्याचा मिश्र शेतीचा प्रयोग यशस्वी; एकाच जमिनीत केली शेवगा, वांगी आणि कांदापात लागवड, पहा हा भन्नाट प्रयोग