पंजाबराव डख यांच्यावर आरोप लावणारे दीपक जाधव यांचा हवामान अंदाज ! आणखी ‘इतके’ दिवस पडणार अवकाळी पाऊस, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाबराव डख आणि नासिक येथील दीपक जाधव यांची कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल झाली होती. यामध्ये नासिक जिल्ह्यातील हवामान अंदाज वर्तवणारे दीपक जाधव यांनी पंजाबराव डख यांच्यावर मोठे आरोप केले होते. यावेळी डखं यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे दीपक जाधव संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दीपक जाधव हे चांदवड येथील आहेत.

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडणार; पण ‘या’ जिल्ह्यात पाऊस घेणार विश्रांती, पहा IMDचा अंदाज

ते राहुरी कृषी विद्यापीठातून कृषी पदवीधर आहेत. ते देखील डख यांच्याप्रमाणेच हवामान अंदाज व्यक्त करतात. मात्र जाधव केवळ आणि केवळ नाशिक जिल्ह्यातील हवामान अंदाज सांगत असतात. अशा परिस्थितीत आज आपण जाधव यांनी नाशिक जिल्ह्यासाठी काय हवामान अंदाज वर्तवला आहे याबाबत जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज थोडक्यात जाणून घेऊया

हे पण वाचा :- कर्मचाऱ्यांनो यापुढे संपात उतरला तर याद राखा! राज्य शासन करणार ‘ही’ कारवाई, पहा…

पंजाबरावांचा हवामान अंदाज 

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे. हे तीन दिवस मात्र राज्यात सर्व दूर पाऊस राहणार नाही. भाग बदलत मात्र पाऊस पडणार आहे. शिवाय मे महिन्यातही पावसाची शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. मे महिन्यात पहिल्या आठवड्याच्या शेवटी आणि पंधरा मे नंतर राज्यात पावसाची शक्यता राहणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :- पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे अन ‘या’ जिल्ह्यात पुढील 4 ते 5 तासात कोसळणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा

दीपक जाधव यांचा हवामान अंदाज

नासिक जिल्हाबाबत दीपक जाधव यांनी महत्त्वाचा हवामान अंदाज जारी केला आहे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे. मात्र यावेळी पाऊस पडणार नाही. 18, 19, 20 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात मात्र पाऊस पडेल परंतु तीव्रता कमी राहील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यानंतर 26 एप्रिल पासून पुन्हा एकदा हवामानात बदल होईल आणि 28 एप्रिल, 29 आणि 30 एप्रिल रोजी जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता तयार होईल असा अंदाज दीपक जाधव यांनी व्यक्त केला आहे. 

हे पण वाचा :- शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘या’ स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मिळालेत 1 कोटी 60 लाख, पहा….