पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला….! वातावरणात अचानक झाला मोठा बदल ; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार

Panjabrao Dakh Havaman Andaj : आज राज्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान तयार झाले आहे. काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे.

याशिवाय नासिक मध्येही सकाळपासूनच ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. मात्र, परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी तीन-चार दिवसांपूर्वीचं राज्यातील हवामान बदलणार असल्याचा अंदाज बांधला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

म्हणजे डख यांचा हवामान अंदाज आता तंतोतंत खरा ठरत असल्याचं चित्र आहे. यामुळे आज आपण पंजाब रावांनी वर्तवलेला सुधारित हवामान अंदाज जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामानांचा नुसार, नासिक व आजूबाजूच्या जिल्ह्यात 25 तारखेपासून हवामान खराब होण्यास सुरुवात होणार आहे. झालं देखील तसचं आज नाशिक जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळाले तसेच अहमदनगर मध्ये देखील तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस विशेषता राहुरी तालुक्यात पाहायला मिळाला आहे.

याशिवाय पंजाबराव डख यांनी 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस कोसळेल अशी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 26 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नासिक व आजूबाजूच्या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यादरम्यान या भागात मात्र ढगाळ हवामान कायम राहणार आहे. तसेच याच कालावधीत मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मराठवाड्यात अन पश्चिम विदर्भात हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे.

तर पश्चिम विदर्भात मात्र काही ठिकाणी मोठा पाऊस देखील पडू शकतो अन पश्चिम विदर्भातच या पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचे डख यांनी नमूद केले आहे. एकंदरीत पश्चिम विदर्भात पुढील तीन दिवस मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. निश्चितच आत्तापर्यंत पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला असून उद्यापासून 28 जानेवारीपर्यंत जर त्यांनी वर्तवलेल्या भागात पाऊस कोसळला तर शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते अशी भीती देखील आता जाणकारांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.