Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पंजाबराव डख म्हणताय की उद्यापासून आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? पहा…

Panjabrao Dakh Latest Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज व्यक्त केला आहे. डखं यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील काही भागात तापमानात वाढ होणार असून उष्णतेची लाट येणार आहे.

Panjabrao Dakh Latest Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज व्यक्त केला आहे. डखं यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील काही भागात तापमानात वाढ होणार असून उष्णतेची लाट येणार आहे. मात्र असे असले तरी उद्यापासून राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे. उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

21 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता राहणार असल्याचे मत डखं यांनी व्यक्त केले आहे. एका यूट्यूब चैनल वर दिलेल्या माहितीनुसार, डख यांनी राज्यात उद्यापासून पावसाची शक्यता वर्तवली असून 28 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस राज्यातील काही जिल्ह्यात पडणार आहे. मात्र हा पाऊस सर्व दूर राहणार नसून काही मोजक्या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम राहील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केल आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात विकसित होत असलेला ‘हा’ चार मजली उड्डाणपूल ‘या’ महिन्यात बांधून तयार होणार, पहा…..

दरम्यान हवामान विभागाने देखील राज्यातील काही भागात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज नुकताच वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल तर काही जिल्ह्यात तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवणार आहे. निश्चितच आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची भीती राहणार आहे.

वास्तविक या चालू एप्रिल महिन्यात अगदी सुरुवातीपासून अवकाळी पावसाने थैमान माजवले आहे. गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके, कांदा तसेच इतर फळबाग व बागायती पिकांना या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

हे पण वाचा :- 12वी पास अन Typing कोर्स केलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात मोठी भरती सुरू, पहा….

मे महिन्यात देखील पाऊस पडणार?

विशेष म्हणजे पंजाबराव डख यांनी मे महिन्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही जाहीर केला आहे. मे महिन्यात पाच आणि सहा मे दरम्यान तसेच 15 आणि 16 मे दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे. वास्तविक, मे महिन्यात लग्नाच्या अधिक तारखा आहेत. अशा परिस्थितीत पुढल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात पडणारा हा पाऊस लग्नाच्या कार्यात विघ्न आणू शकतो.

यामुळे लग्न कार्य असलेल्या लोकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात कोणत्या जिल्ह्यात आणि किती दिवस पाऊस पडेल याबाबत सविस्तर असा अंदाज डखं येत्या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करणार आहेत. यामुळे आता डखं यांचा येणारा अंदाज काय सांगतो? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :-आनंदाची बातमी ! मुंबईमधल्या ‘या’ अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, केलं जाणार ‘हे’ महत्वाचं काम, असा होणार प्रवाशांचा फायदा