Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पंजाबराव डख : 2023 चा मान्सून कसा राहणार? केव्हा होणार पावसाचं आगमन, कधी होणार पेरण्या?, डख यांनी सांगितली सविस्तर माहिती

Panjabrao Dakh Monsoon 2023 : गेल्या काही दिवसांपासून यावर्षी दुष्काळ पडेल असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या एल निनोच्या भाकितानंतर यावर अधिकच गप्पा सुरू आहेत.

Panjabrao Dakh Monsoon 2023 : गेल्या काही दिवसांपासून यावर्षी दुष्काळ पडेल असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या एल निनोच्या भाकितानंतर यावर अधिकच गप्पा सुरू आहेत. अमेरिकन हवामान विभागानंतर देशातीलही इतर काही हवामान संस्थांनी या एलनिनोच्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, यावर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोबतच यावर्षीच्या मान्सून बाबत देखील त्यांनी मोठ भाकीत वर्तवलं आहे. अशा परिस्थितीत आज आपण एलनिनोबाबत पंजाबराव डख यांनी काय सांगितले, यंदाचा मान्सून महाराष्ट्रात कसा राहील, केव्हा पाऊस पडेल, केव्हा पेरण्या होतील याबाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- दिलासादायक ! अखेर राज्य शासनातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न लागला मार्गी; वाचा सविस्तर

एलनिनो बाबत पंजाबरावांचे मत 

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनो हा मुळात एक पॅनिश शब्द आहे ज्याचा मराठीत अर्थ होतो बाळ येशू. हे नाव पडण्यामागे कारण म्हणजे हा एलनीनो डिसेंबर महिन्यात येतो आणि बाळ येशु यांचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला आहे यामुळे या हवामान प्रणालीला एलनिनो असं संबोधलं जातं. तसेच एल निनो आणि ला-निना या आलटून पालटून सुरू राहणाऱ्या समुद्रातील प्रक्रिया असल्याचे मत डख यांनी यावेळी वर्तवले.

याबाबत पुढे बोलताना त्यांनी माहिती दिली की, दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशाच्या किनाऱ्यालगत प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचे डिसेंबर मध्ये ज्यावेळी अर्ध्या अंशाने तापमान वाढते त्यावेळी सौम्य एल निनोचा धोका असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात तसेच या समुद्राचे तापमान ज्यावेळी दोन अंशांनी वाढते त्यावेळी अति तीव्र स्वरूपाचा एल निनो येईल असं या संस्थांच्या माध्यमातून जाहीर केलं जातं.

लनिनोमुळे दुष्काळ येईल असे या संस्थांच्या माध्यमातून मग जाहीर केलं जात. मात्र एलनिनोचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलनिनो असो वा नसो महाराष्ट्रात दरवर्षी 7 जुनच्या सुमारास मान्सूनचे आगमन हे होतेच.

हे पण वाचा :- जुनी पेन्शन योजना : OPS ला नक्षलवाद्यांचे समर्थन; ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा जुनी पेन्शन मुद्दा चर्चेत

कसा राहील यंदाचा मान्सून?

एलनिनो सोबतच त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत देखील मोठी माहिती यावेळी दिली आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा 8 जूनला मान्सूनचं राज्यात आगमन होणार आहे. मात्र यावेळी फक्त मान्सूनचे आगमन होईल. सर्वत्र या कालावधीमध्ये पाऊस पडणार नाही. 22 जून पर्यंत मात्र सर्वत्र महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. 22 जूनला उसाची तीव्रता वाढेल आणि 27 ते 28 जून पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या जातील असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.

28 जून पर्यंत राज्यात बहुतांशी भागात सोयाबीनची पेरणी होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं. यासोबतच जून पेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस राहणार आहे आणि जुलै पेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अधिकचा पाऊस राहील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केल आहे. याशिवाय त्यांनी यावर्षी 26 ऑक्टोबर पासून थंडी सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेर थंडीला यावर्षी सुरुवात होणार आहे.

याशिवाय नोव्हेंबर महिन्यात देखील पावसाची शक्यता कायम राहणार आहे, दिवाळीत यंदाही पाऊस पडणार असल्याच मोठ भाकीत डक यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आल आहे. निश्चितच डख यांचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी समाधानाचा आहे. यामुळे आता अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दुष्काळ पडतो की डखं यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 2022 प्रमाणेच याही वर्षी चांगला पाऊस पडतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा :- महावितरणची शेतकऱ्यांसाठी मोठी ऑफर! ‘इतकं’ वीजबिल भरा आणि थकबाकी मुक्त व्हा, आधी सविस्तर माहिती वाचा