पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार अवकाळी; ‘या’ तारखेला थांबणार पावसाचं थैमान, पहा काय म्हटले डख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh New Weather Update : राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरं पाहता पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की डख यांनी एक एप्रिल 2023 ला एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता. त्यांनी त्यावेळी राज्यात 6 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार राज्यात अवकाळी पाऊस कोसळला असून आता आणखी पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी! ITBP मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार मिळणार तब्बल 85 हजार, पहा भरतीची संपूर्ण माहिती

जर गेल्या वेळी जसा त्यांचा अंदाज खरा ठरला तसाच यावेळी सुद्धा त्यांचा अंदाज खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे यात तीळमात्र देखील शंका नाही. काल म्हणजे 12 एप्रिल 2023 रोजी पंजाबराव डख यांनी त्यांच्या अधिकृत youtube चैनल वर दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल पासून म्हणजे आजपासून पुन्हा एकदा राज्याच हवामान बिघडणार आहे.

राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पुन्हा सुरु होणार आहे. 13 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यावेळी मात्र पडणारा पाऊस हा राज्यात सर्व दूर पडणार नाही. भाग बदलत पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! मका नाही तर मधुमक्याची सुरु केली शेती, कमी पाण्यात मिळवले विक्रमी उत्पादन; 3 महिन्यात झाली लाखोंची कमाई, वाचा…

यामुळे कांदा काढणी करत असलेल्या शेतकरी बांधवांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे. 16 एप्रिल पर्यंत ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरुच राहणार असल्याने याचा विपरीत परिणाम कांदा समवेतच इतर शेती पिकांवर होणार आहे. दरम्यान उद्या १४ एप्रिल अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे.

अशातच राज्यात पावसाची शक्यता असल्याने यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पावसातच नागरिकांना साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे. मित्रांनो, जर आपणास पंजाबराव डख यांनी वर्तवलेला अंदाज त्यांच्या यूट्यूब चैनल वर जाऊन बघायचा असेल तर आपण https://youtu.be/PtgqpmaBGJY या लिंक वर जाऊन त्यांच्या यूट्यूब चैनलला भेट देऊ शकणार आहात. 

हे पण वाचा :- अखेर प्रतीक्षा संपली ! म्हाडा ‘या’ मंडळात काढणार 4000 घरांसाठी लॉटरी; ‘या’ महिन्यात निघणार सोडत, घरांची किंमत आणि जागेचा तपशील वाचा