Panjabrao Dakh: उर्वरित जून महिन्यात कसा राहील महाराष्ट्रमध्ये पाऊस? पाऊस थांबणार की बरसणार? वाचा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh:- सध्या संपूर्ण राज्यामध्ये जवळपास मान्सूनने एन्ट्री केली असून जवळपास आज आणि उद्या मध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्यांना वेग आलेला आहे.

बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसाने जनजीवनावर देखील परिणाम पाहायला मिळत आहे. या सगळ्या पावसाच्या समाधानकारक परिस्थितीत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी जून महिन्यासाठी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे.

डख यांनी हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की राज्यामध्ये आज आणि उद्या राज्यात भाग बदलत पाऊस पडेल तसेच राज्यामध्ये सध्या तरी पावसाचा कुठलाच खंड पडणार नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती पंजाबरावांनी दिली आहे.

 15 ते 22 जून दरम्यान राज्याच्या या भागात होईल चांगला पाऊस

राज्यामध्ये 22 जून पर्यंत पाऊस सुरू होणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती पंजाबराव डख यांनी दिली असून राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार असे देखील त्यांनी म्हटले आहे. 15 ते 17 जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची मात्र उघडीप पाहायला मिळणार आहे.

परंतु विदर्भात पाऊस सर्वसाधारण असून उद्यापर्यंत म्हणजे 15 जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडेल अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे.पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल व या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे व नाले देखील भरून वाहतील.

विदर्भामध्ये देखील पावसाला सुरुवात होणार असून 20 जून पर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतील असा महत्वपूर्ण अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भात 12 तारखेपासून ते 22 जून पर्यंत तसेच या दहा दिवसाच्या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

 या जिल्ह्यांमध्ये पडेल जोराचा पाऊस

राज्यातील धाराशिव तसेच सोलापूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली असून येणारे तीन ते चार दिवस राज्यातील सोलापूर, सातारा, सांगली, नासिक,

धुळे, जळगाव, अहमदनगर, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe