Panjabrao Dakh:- यावर्षी मोसमी पावसाने वेळेआधीच महाराष्ट्र मध्ये एन्ट्री केली आणि राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेरणी योग्य स्वरूपाचा पाऊस झाला व खरिपाच्या पेरण्यांना देखील बऱ्याच ठिकाणी सुरुवात झाली. परंतु गेल्या काही दिवसापासून मान्सूनचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अजून देखील राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
परंतु काही ठिकाणी मात्र कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पाऊस पडण्याची प्रतीक्षा असून या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे.
राज्यात या तारखेपासून होणार पावसाला सुरुवात
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार जर बघितले तर राज्यात 22 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे व त्यानंतर मात्र परिस्थितीत बदल होणार असून 23 जून नंतर महाराष्ट्रात विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणार असून 23 ते 25 जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
एवढेच नाही तर 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली असून या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे.
तसेच दहा ते पंधरा जुलै या कालावधीत देखील चांगला पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली असून जुलै महिन्यातील एकोणावीस, 20 तसेच 25 व 26 या तारखांना देखील चांगला पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
राज्यातील बऱ्याच ठिकाणी पेरणीला झाली आहे सुरुवात
सुरुवातीला ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली असून ज्या भागामध्ये अजून पर्यंत चांगला पावसाची प्रतीक्षा आहे अशा ठिकाणी अजून पेरण्या झालेल्या नसून जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन देखील कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जोपर्यंत शंभर मिली मीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन देखील कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.