Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ तारखेला पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार; पंजाबरावांचा अंदाज

Panjabrao Dakh Weather Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात सातत्याने हवामानातं बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Panjabrao Dakh Weather Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात सातत्याने हवामानातं बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गहू, हरभरा तसेच केळी, पपई, डाळिंब, द्राक्ष या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र एक एप्रिल पासून राज्यात हवामान कोरडे आहेत. विदर्भ वगळता जवळपास सर्वत्र हवामान कोरडे पाहायला मिळत आहे. अशातच मात्र हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘हे’ दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा

पंजाबरावं डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 6 एप्रिल पासून पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे.

6 एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी! ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई; महामंडळाचे पत्र निर्गमित

यां कालावधीत राज्याच्या अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे मत डख यांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय 14 एप्रिल ते 17 एप्रिल पर्यंत पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे. हा पाऊस मात्र मराठवाडा आणि विदर्भात प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी! या पदाच्या रिक्त जागेवर भरती सुरु; आजच करा इथं अर्ज

या कालावधीमध्ये उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. निश्चितच पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

6 एप्रिल पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी पाच एप्रिल पर्यंत आपली शेती कामे आटपून घ्यावीत असा सल्ला देखील डख यांनी दिला आहे. निश्चितच पंजाबराव यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे.

हे पण वाचा :- सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ रिक्त पदासाठी भरती सुरू; दहावी पास करू शकणार अर्ज, पहा डिटेल्स