पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास ! नगरमध्ये कोणाचा विजय होणार ? विखे पाटील म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

लोकसभा निवडणुकीत विश्वनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या निर्धार देशातील जनतेन केला होता.मतदाना नंतर आलेल्या कल चाचण्यातून यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे मत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की.अहील्यानगर दक्षिण मतदारसंघात महायुतीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त करून लोकांनी विकास प्रक्रीयेला साथ दिली असल्याचे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास प्रक्रीयेला देशातील मतदारांनी पाठबळ दिले.

अहील्यानगर मतदार संघातही जनतेन विकासालाच प्राधान्य दिले.त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय होणार हा विश्वास आमचा कायम असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवताना मंत्री विखे पाटील म्हणाले की ज्यांना काॅग्रेससाठी जिल्ह्यात एकही जागा आणता आली नाही.त्यांनी दुसर्यांची तळी उचलण्यात त्यांनी धन्यता मानली. आता स्वताच्या अस्तित्वाची चिंता करा असा खोचक सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला.

सुपा येथील अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेत कोणतीही राजकीय सूडबुध्दी नाही.प्रशासनाने ही कारवाई केली आहे.जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमण सगळीकडेच काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.यामुळे गुन्हेगारीला पाठबळ मिळत होते.पण ज्यांनी आशा भाडोत्री लोकांमार्फत आपला धंदा सुरू ठेवला आहे त्यांना वाईट वाटणे सहाजिक असल्याचा टोला त्यांनी आरोप करणार्यांना लगावला.

अचारसंहीता अद्याप शिथिल झाली नसली तरी टंचाईच्या बाबतीत सर्व सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.पाणी आणि चारा यांची टंचाई कुठेही भेडसावणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe