ज्योतिष शास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र असून यामध्ये ग्रह तारे व त्यांचा राशींवर पडणारा प्रभाव इतर महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. भारतामध्ये आज देखील ज्योतिषशास्त्राला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व असून कुठल्याही प्रकारच्या शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर आपण त्याचा मुहूर्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पाहतो व तरच कार्याला सुरुवात करतो.
तसेच ज्योतिष शास्त्रानुसार वर्तवण्यात आलेल्या राशी भविष्याला आज देखील या आधुनिक युगामध्ये तितकेच महत्त्व दिले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर आपण अनेक प्रकारच्या अशी काही आभूषणे किंवा वस्तू आहेत की ते परिधान केल्याने व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. अशाप्रकारे जर आपण ज्योतिष शास्त्रात महत्व असलेल्या आभूषणाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये कासवाच्या अंगठीला खूप महत्त्व असते. आपण पाहिले असेल की बऱ्याच जणांच्या हाताच्या बोटामध्ये आपल्याला कासवाची अंगठी दिसून येते.
ज्योतिष शास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने काय होतो फायदा?
ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर कासवाची अंगठी हातात घातली तर सकारात्मक परिणामांसाठी ती महत्त्वाचे असते व ही अंगठी हातात घातल्यामुळे धनलाभ देखील होतो व आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होते. घरामध्ये सुख शांतता नांदते. कासव हा प्राणी पाण्यामध्ये राहत असल्याने पाण्याचे शितल असे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय रागीट असेल तर असे लोकांना शांत करण्यासाठी देखील कासवाची अंगठी परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते.
या राशींच्या लोकांनी मुळीच हातात घालू नये कासवाची अंगठी
1- मेष- जर आपण मेष राशीचा विचार केला तर या राशीच्या व्यक्तींनी कासवाची अंगठी हातात कधीच घालू नये. ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो व यामुळे जर तुम्ही कासवाची अंगठी घातली तर आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्योतिषांचा सल्ला घेऊनच या संबंधीचा निर्णय घ्यावा.
2- कन्या राशी- कन्या राशीच्या व्यक्तीने देखील कासवाची अंगठी घालू नये. या राशीचा स्वामीग्रह बुध असून तुम्ही कासवाची अंगठी परिधान केली तर आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच वैवाहिक आयुष्यात देखील अडचण येण्याची शक्यता असते.
3- वृश्चिक राशी- या राशीचा स्वामी ग्रह सुद्धा मंगळ आहे. जर वृश्चिक राशींच्या लोकांनी कासवाची अंगठी धारण केली तर त्यांच्यावर मंगळ ग्रहाची वक्रदृष्टी पडण्याची भीती असते व नुकसान होऊ शकते.
4- मीन राशी- मीन राशीच्या स्वामी ग्रह बृहस्पती आहे व अशा स्थितीमध्ये जर मीन राशींच्या व्यक्तीने कासवाची अंगठी हातात घातली तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. चांगली आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता असते. तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते.
कासवाची अंगठी कशा पद्धतीची असावी?
ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर कासवाची अंगठी घालण्याची एक विशिष्ट पद्धत असून कासवाची अंगठी ही चांदीची असणे गरजेचे आहे व तिच्या पाठीवर श्री असे लिहिलेले असावे. तसेच कासवाची अंगठी खरेदी करायची असेल तर ती कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेलाच खरेदी करावी. खरेदी केल्यानंतर तुळशी पत्र,मध, गंगाजल तसेच दही अशा पाच पदार्थांचा पंचामृत बनवून घ्यावे व वैष्णोदेवी आणि देवी लक्ष्मी जवळ दिवा पेटवून 108 वेळा ओम भगवते कुर्माय ही नमः या मंत्राचा जप करावा व त्यानंतर पंचामृतने अभिषेक करावे व ती नंतर धारण करावी. तसेच अंगठी धारण करताना कासवाचे तोंड म्हणजेच मूख आपल्याकडे असेल याची खात्री करून घ्यावी.
(टीप- वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा त्यामागील उद्देश आहे. या माहिती विषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाहीत.)