Farming Business Idea: एका एकरमध्ये लावा 120 झाडे, 12 वर्षात व्हाल कोट्याधीश! वाचा संपूर्ण ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea :- शेती करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला, फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करतो. असे पाहायला गेले तर आता शेती ही नुसती उदरनिर्वाह पूरती राहिली नसून ती

व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने शेतकरी बंधू वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच भाजीपाला किंवा फळपिकांप्रमाणेच जास्त जमीन असलेले किंवा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी बांबू आणि साग यासारख्या झाडांची देखील लागवड करतात.

या झाडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन असा पैशांचा स्त्रोत निर्माण होतो. तसेच या झाडांना इतर पिकांप्रमाणे जास्त खर्च देखील करावा लागत नाही व कमीत कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये हे चांगले उत्पादन देऊ शकतात.

या झाडांच्या यादीमध्ये जर आपण महोगनी या झाडाचा किंवा महोगनी शेती बद्दल जर पाहिले तर याचे लाकूड आणि पाने देखील बाजारामध्ये खूप चांगल्या भावाने विकले जातात. जर आपण याची बाजारपेठेतील मागणी पाहिली तर शेतकरी कमी कालावधीमध्ये कोट्यावधी रुपये सहजपणे कमवू शकतात. याच महोगनी शेती बद्दलची काही माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

कशा प्रकारचे असते महोगनीचे झाड?

महोगनीचे लाकूड हे दीर्घकाळ टिकणारे व मजबूत असते. या लाकडाचा रंग लाल आणि तपकिरी असतो. विशेष म्हणजे यावर पाण्याच्या कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही. महोगणी झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस तापमान देखील हे सहन करू शकते आणि कमीत कमी पाण्यात देखील हे चांगले वाढते.

तसेच ज्या ठिकाणी वाऱ्यांचा वेग कमी असतो अशा ठिकाणी महोगणीची रोपे उगवतात. कारण महोगणीचे झाड 40 ते दोनशे फूट पर्यंत उंच वाढते. भारतामध्ये साधारणपणे हे झाडे साठ फूट उंचीपर्यंत वाढतात. या झाडाची मुळे उथळ असतात व ते डोंगराळ भाग वगळता कुठेही वाढू शकतात. कुठल्याही प्रकारच्या सुपीक जमिनीमध्ये या झाडांची वाढ चांगली होते. परंतु महोगणीचे झाड कधीही पाणथळ जमिनीमध्ये किंवा खडकाळ जमिनीमध्ये लावने टाळावे.

या झाडाचा वापर किंवा लाकडाचा वापर कुठे होतो?

महोगणीच्या झाड अतिशय मौल्यवान म्हणून ओळखले जाते व याचे लाकूड अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. या झाडाच्या लाकडावर पाण्याचा देखील कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे जहाजे, मौल्यवान दगड, फर्निचर, प्लायवूड, सजावटीच्या वस्तू आणि शिल्पे बनवण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो.

एवढेच नाही तर महोगणी झाडाच्या पानांचा वापर हा कर्करोग, रक्तदाब, दमा तसेच सर्दी व डायबेटीस अशा अनेक आजारांवर होतो. तसेच महोगणीच्या झाडाच्या पानांमध्ये एक विशेष गुण असतो व यामुळे डास आणि कीटक या झाडाजवळ येत नाहीत. या कारणामुळेच महोगणीची पाने आणि बियांचे तेल मच्छर प्रतिबंधक आणि कीटकनाशके बनवण्यासाठी वापरले जाते. या तेलाचा वापर साबण, रंग तसेच वार्निश व इतर प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.

महोगनीच्या झाडापासून किती पैसे मिळू शकतात?

महोगनीचे झाड पाच वर्षातून एकदा बियांचे उत्पादन देऊ शकते. साधारणपणे महोगनीच्या एका रोपातून पाच किलो बिया निघतात. या बियांची किंमत खूपच जास्त असते व ते 1000 रुपये प्रति किलो पर्यंत देखील विकले जातात. तसेच महोगणीचे लाकूड दोन ते 2200 रुपये प्रति घनफूट दराने मोठ्या प्रमाणावर विक्री होते.

तसेच मोहगनी एक औषधी वनस्पती असल्यामुळे त्याच्या बिया आणि फुलांचा उपयोग टॉनिक औषधे बनवण्यासाठी देखील केला जातो. जर आपण एका एकर जागेमध्ये 120 मोहगणीची झाडे लावली तर आपल्याला बारा वर्षात कोटी रुपये कमवता येतील.

महोगनीचे लाकूड दोन हजार रुपये प्रति घनफूट या दराने विकले जाते व यानुसार एका झाडाचे किंमत 40000 ते 50 हजार रुपये इतकी होते. याची लागवड तुम्ही शेताच्या बांधांवर देखील करू शकतात किंवा संपूर्ण शेतामध्ये देखील लागवड करू शकतात.