PMAY Scheme : प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घ्यावा?लाभार्थ्यांची यादी कशी पहावी? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMAY Scheme:- भारतामध्ये ज्या व्यक्तींकडे स्वतःचे पक्के घर नाही असे बेघरांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण भागातील पात्र व्यक्तींकरिता परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2025 पर्यंत सर्वांसाठी घरे हा उद्देश यशस्वी करण्यासाठी राबवली जात आहे. एक सरकारी अनुदानित योजना असून संपूर्ण देशातील अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकसंख्येला स्वतःचे घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देते.

साधारणपणे 2015 मध्ये ही योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये सुरू करण्यात आली होती. जर या योजनेचे यश पाहिले तर आतापर्यंत 122 लाखांपेक्षा जास्तीचे घरे या योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली असून 68 लाखांपेक्षा जास्त घरे पूर्ण करण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर बांधण्याकरिता या योजनेच्या माध्यमातून आर्थिक अनुदान दिले जाते. 2022 च्या अखेर पर्यंत संपूर्ण देशांमध्ये दोन कोटी परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले होते.

परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोरोना निर्बंधामुळे या योजनेचा वेग काहीसा मंदावला व शासनाने या योजनेला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली. या योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी असे दोन उपविभाग असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अगोदर इंदिरा आवास योजना म्हणून ओळखली जायची. या योजनेचे उद्दिष्ट भारतातील ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हे आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही योजना भारतामधील शहरी भागांवर केंद्रित करते.

 या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

शासनाने सुरू केलेल्या या महत्वकांक्षी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांना स्वतःची नोंदणी करायची आहे ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चार घटकांपैकी एका घटकांमध्ये आपला अर्ज करू शकतात. ते घटक म्हणजे…

1- इन सीटू( झोपडपट्ट्यांचे ) पुनर्वसन या घटकांमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे जे काही रहिवासी आहेत व त्यांच्याकडे कोणतीही पक्के घर नाही त्यांच्याशी हा घटक संबंधित असून अर्जदारांचा हा गट घरासाठी अर्ज करू शकतो.

2- तसेच ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे परंतु ज्यांना घर बांधण्यासाठी किंवा नूतनीकरणाकरिता पैशांची गरज आहे असे लाभार्थी नेतृत्वातील बांधकाम(बीएलसी) यामध्ये येतात व अर्जदारांचा हा गट पैशांसाठी अर्ज करू शकतो.

3- क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम अर्थात सीएलएसएस – या गृह कर्ज योजना असून समाजातील विशिष्ट वर्गाला त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित या योजनेचा लाभ मिळतो. या गटातील अर्जदार देखील अनुदानासाठी अर्ज करू शकता.

4- भागीदारीमध्ये परवडणारी घरे अर्थात एएचपी ज्या व्यक्तीकडे जमीन नाही किंवा ते गृह कर्ज घेऊ शकत नाही अशा व्यक्तींकरता ही योजना असून या गटातील अर्जदार देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

 या योजनेसाठी आवश्यक पात्रता

या योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाने घरांसाठी अर्ज करण्याकरिता तुम्ही समाजातील अल्प उत्पन्न गटातील किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील संबंधित असणे गरजेचे आहे. तसेच…

1- तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा पक्क्या घराचा मालक नसणे आवश्यक आहे.

2- घरामध्ये तुमचा जोडीदार आणि अविवाहित मुली असणे.

3- वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेली कुटुंबे इडब्ल्यूएस श्रेणीतील आहेत तर तीन ते सहा लाख रुपयांच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचे आहे ते एलआयजी श्रेणीतील आहेत. तुम्ही यापैकी कोणत्या गटाशी संबंधित असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा ठोस पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे.

4- ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा ते बारा लाख रुपयांच्या दरम्यान आहे असे मध्यम उत्पन्न गट 1 श्रेणीमध्ये येतात आणि यासाठी 9 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर व्याज अनुदानाचा लाभ यांना मिळू शकतो.

5- वार्षिक 12 ते 18 लाख रुपये कौटुंबिक उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती या योजनेच्या माध्यमातून गट अर्थात एमआयजी 2 अंतर्गत येतात आणि बारा लाखापर्यंतच्या गृह कर्जावर व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

6- एस सी, एसटी आणि ओबीसी यासारख्या अल्पसंख्यांक गटातील लोक अल्पसंख्याकाखाली येतात आणि या लोकांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्याकरिता जातीचे आणि उत्पन्नाच्या प्रमाणपत्र देणे गरजेचे असते.

7- एवढेच नाही तर ही एक महिलांना मदत करणारी योजना असून कुटुंबातील महिला सदस्यांना घर घेण्याला या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाते.

8- तळमजल्यावर असलेल्या घरासाठी अर्ज करताना वृद्ध आणि अपंग नागरिकांना इतर व्यक्तींपेक्षा प्राधान्य दिले जाईल.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्णपणे भरलेला अर्ज, स्वयं प्रतिज्ञापत्र उत्पन्न प्रमाणपत्र( फक्त उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्यास), पॅन कार्ड / आधार कार्ड/ मतदार ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स / मनरेगा क्रमांक लाभार्थीच्या मूळ जिल्ह्याच्या महसूल मालकीचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व ओळख पुरावा,

जातीचे प्रमाणपत्र( एस सी, एसटी / ओबीसी आणि  अल्पसंख्यांक), पत्त्याच्या पुराव्याची प्रत, उत्पन्नाचा पुरावा जसे की पगार स्लिप किंवा पगार प्रमाणपत्र किंवा इतर उत्पन्न, नवीनतम आयकर विवरण / आयकर मूल्यांकन आदेश / फॉर्म क्रमांक 16 लागू असल्यास, बँक खात्याचे स्टेटमेंट( मागील सहा महिन्याचे, भारताच्या कोणत्याही भागांमध्ये त्याच्या / तिच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे पक्के घर नसल्याचे सांगणारे लाभार्थ्याकडून प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

 या योजनेअंतर्गत नोंदणी कशी करावी?

पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत नोंदणी करण्यासाठी संबंधित नागरी स्थानिक संस्था यांच्या माध्यमातून ऑनलाईन किंवा ऑफलाइन प्रकारे विनामूल्य मागणी सर्वेक्षण केले जाते. पात्र लाभार्थी मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून देखील ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

राज्य तसेच केंद्रशासितप्रदेश यांनी त्यांच्या सामान्य सेवा केंद्र अर्थात सीएससी केंद्रावर पंचवीस रुपये अधिक सेवा कर या नाममात्र शुल्कावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पात्र लाभार्थी हे देशातील कोणत्याही सीएससी सेंटर वरून अर्ज करू शकतात.

 लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?

1- याकरिता तुम्हाला पी एम ए वाय- ग्रामीण या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.

2- या ठिकाणी असलेल्या आवास सॉफ्ट यावर क्लिक करावे आणि तुम्हाला एक ड्रॉप डाऊन मेनू या ठिकाणी मिळेल.

3- या मेनू मधून रिपोर्टवर क्लिक करा आणि तुम्हाला एक नवीन वेब पेजवर रिडायरेक्ट केले जाते.

4-H सोशल ऑडिट रिपोर्ट तपासण्यासाठी खाली स्क्रोल करा व H बॉक्समध्ये पडताळणी करता लाभार्थी तपशील वर क्लिक करा.

5- या पेजवरील राज्य, जिल्हा आणि शहराप्रमाणे डावीकडे निवड फिल्टर नमूद करा.

6- दिलेल्या कॅपच्याचे योग्य उत्तर नमूद करा आणि सबमिट वर क्लिक करा.

 नाहीतर ही पद्धत देखील वापरू शकतात ती म्हणजे..

1- या योजनेच्या होम पेजवर हितधारक वर क्लिक करावे.

2- डाऊन मेनू मधून IAY/PMAYG लाभार्थी वर क्लिक करा.

3- या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक विचारणाऱ्या नवीन टॅब वर रिडायरेक्ट केले जाईल.

4- सूचीमध्ये आपले नाव शोधण्याकरिता अधिक विशिष्ट तपशील प्रविष्ट करण्यासाठी तुम्ही या पेजवरील प्रगत शोध वर क्लिक करू शकता व यादी पाहू शकता.