भारतामध्ये अनेक देशी आणि विदेशी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळे स्मार्टफोन लॉन्च करण्यात येत असून यामध्ये सर्वसाधारण नागरिकांना परवडतील अशा स्मार्टफोन पासून तर काही लाखो रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन सध्या बाजारामध्ये विक्रीसाठी आहेत.
यातून ग्राहक हे त्यांचा आर्थिक बजेट आणि हवी असलेली वैशिष्ट्ये ज्या फोनमध्ये आहेत ते पाहूनच स्मार्टफोनची खरेदी करण्याला प्राधान्य देतात.

सध्या अनेक कंपन्यांनी अगदी परवडणाऱ्या किमतींमध्ये उत्तम असे फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले असून यामध्ये आता शाओमीचा भारतातील सब ब्रँड पोकोने देखील परवडणाऱ्या किमतीमध्ये उत्तम असा स्मार्टफोन लॉन्च केलेला असून हा 5G स्मार्टफोन आहे व यामध्ये अनेक भन्नाट अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.
पोकोने भारतीय बाजारात लॉन्च केला पोको M6 Plus 5G स्मार्टफोन
याबाबत सविस्तर वृत्त असे की,चिनी टेक कंपनी असलेल्या शाओमीच्या भारतीय सब ब्रँड पोकोने भारतीय बाजारामध्ये पोको M6 Plus 5G स्मार्टफोन लॉन्च केलेला असून हा कॉलकॉम आणि स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 AE चीफसेटने सज्ज असून यामध्ये अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात आलेला आहे.
या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरील्ला ग्लास तीन संरक्षण आणि 108 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरासह 6.19 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
कसा आहे या फोनचा कॅमेरा?
या फोनमध्ये उत्तम फोटोग्राफी करिता ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे व यामध्ये एआय नाईट मोडसह 50 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आणि दोन मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड सेन्सर चा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करीता यामध्ये तेरा मेगापिक्सल कॅमेरा समोर देण्यात आलेला आहे.
कशी आहे या फोनची बॅटरी?
उत्तम पावर बॅकअप मिळण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5030 mAh बॅटरी देण्यात आली असून ती चार्जिंगसाठी 33W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
इतर वैशिष्ट्ये
या फोनमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटीकरिता ड्युअल सिम 5G,4G, वाय-फाय तसेच ब्लूटूथ आणि 15 5G बँडसाठी समर्थन आहे व याशिवाय या फोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर, डॉल्बी ऍटमॉस, वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन IP53 रेटिंग तसेच साईड फिंगर प्रिंट सेंसरसारखे पर्याय देण्यात आले आहेत.
किती आहे या फोनची किंमत आणि कधी होईल विक्रीसाठी उपलब्ध?
पोको M6 Plus 5G स्मार्टफोन हा 5 ऑगस्ट पासून भारतीय बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे व हा दोन स्टोरेज प्रकारांमध्ये कंपनीने लॉन्च केला आहे व यातील पहिला प्रकार म्हणजे 6GB रॅम+128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB स्टोरेज हा दुसरा प्रकार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 13499 रुपये असून हा ग्रॅफाइट ब्लॅक, मिस्टी लव्हेंडर आणि आईस सिल्वर या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.